Technology

काय आहे CrowdStrike? ज्यामुळे ठप्प झाले संपूर्ण जग

microsoft crowdstrike issue causes largest it outage in v0 BlvRUcKnuRZ9sM2dXJRC7e2I jnD1GEWwDG zQhS5Jc
काय आहे CrowdStrike?

कालचा दिवस जरी जागतिक बंद म्हटला तरी चुकीचं ठरणार नाही. क्राउड स्ट्राईकमधील (CrowdStrike) एररमुळे संगणक वापरत असलेल्या अनेक वापरकर्त्यांना काल समस्यांचा सामना करावा लागला. कालच्या एका क्राउड स्ट्राईकमुळे (CrowdStrike) जगभरातील विमानसेवा, बँका, शेअर मार्केट सगळंच ठप्प झालं होतं. काल घडल्या सर्व प्रकाराची जबाबदारी क्राउड स्ट्राईकने घेतली. आमचे इंजिनीअर्स ही एरर दुरुस्त करण्याच्या कामात गुंतले आहेत, त्यामुळे सपोर्ट तिकिट ओपन करण्याची गरज नाही, असं क्राउड स्ट्राईककडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच एरर दुरुस्त झाला की त्यासंबंधी माहिती लगेच वापरकर्त्यांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

क्राउड स्ट्राईक (CrowdStrike) ही कंपनी विंडोज कॉम्प्युटर्ससाठी ॲडव्हान्स्ड सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स सेवा पुरविण्याचं काम करते. विविध स्पेशल रिपोर्ट्सच्या मते जभरातील व्यवस्था ठप्प पाडण्यासाठी फाल्कन हे क्राउड स्ट्राईकचं प्रोडक्ट्स मुख्य कारण ठरलं. फाल्कनमधील तांत्रिक अडचणींमुळे आउटेज निर्माण झालं आहे. फाल्कन ही विंडोज सिस्टिमला सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यरत असलेली एक सिस्टीम आहे. यामुळे संपूर्ण जगातील वापरकर्ते या आउटेजचा अनुभव घेत आहेत.

काय आहे CrowdStrike?

काय आहे CrowdStrike?
Image Source: The Economic Times

क्राउड स्ट्राईक ही एक सायबर सिक्युरिटी कंपनी आहे. ती क्लाउड बेस्ड एंडपॉइंट सुविधा पुरवते. तिचं मुख्य प्रॉडक्ट असलेली फाल्कन ही नेटवर्क ही एंडपॉइंटवरील चुकीच्या, आक्षेपार्ह फाईलचा आणि ॲक्टिव्हिटीचा शोध घेते. त्यांना सिस्टीममध्ये शिरण्यापासून रोखते. या सर्व कृतीसाठी ती एआय बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर करते. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने फाल्कन एंडपॉइंट सिक्युरिटीची काळजी घेते. तुमच्या ऑर्गनायझेशनल किंवा पर्सनल डिव्हाईसवर परिणाम करण्यापूर्वी फाल्कन हे प्रॉडक्ट सुमारे 99 टक्के मालवेअर थ्रेट्स शोधून काढतं असा दावा क्लाउड स्ट्राईक या कंपनीने केला आहे.

या आउटेजमुळे ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि इतर अनेक देशांतील व्यवस्था ठप्प झाल्या. अनेक देशांतील उद्योग आणि नागरिक विशेषतः कर्मचारी अडचणींचा सामना करताना दिसून आले. भारतात शेअर मार्केट्स, फ्लाईट ऑपरेटर्स, बँका आणि न्यूज ऑर्गनायझेशन्सच्या कामावर याचा परिणाम झाला. ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) एरर दिसत असल्याचे फोटो अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले.

फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा एक्स हे फ्लॅटफॉर्म्स बंद पडण्याचा अनुभव जगभरात सर्वांनीच घेतला आहे. अशावेळी फक्त ते ठराविक ॲप आणि त्यावरची ॲक्टिव्हिटी बंद होते. एवढ्याशा गोष्टीनेसुद्धा वापरकर्ते बेचैन होतात आणि काल झालेल्या आऊटेजचा तर संपूर्ण जगभर परिणाम झालाय.