Entertainment

कोण आहे मानसी नाईक?

कोण आहे मानसी नाईक?
कोण आहे मानसी नाईक?
कोण आहे मानसी नाईक?

मराठी कलाविश्र्वात फक्त आपल्या अभिनयामुळेच नाही तर नृत्यामुळे देखील प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. मानसी नाईक हिने आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अनेक हिट गाणी प्रेक्षकांना दिली आहेत. ज्यामुळे मुख्यत्वे महाराष्ट्रात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर नेहमीच चर्चेत असलेल्या या अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

मानसी नाईकचा मराठी सिनेसृष्टीतील प्रवास…

मानसी नाईकला (Manasi Naik) जरी आता अनेक प्रसिद्ध मराठी गाण्यांमुळे ओळखले जात असले तरी, चार दिवस सासूचे (Char Divas Sasuche) या मलिकेतील मुख्य भूमिकेने तिला प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून दिले. त्यानंतर २००७ साली तिने जबरदस्त (Zabardast) या चित्रपटात नुपूर ही भूमिका साकारत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

चार दिवस सासूचे या मालिकेमुळे मानसीला एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळाली.
Image Source: sai shankar films

त्यापुढे तीने तुक्या तुकविला नाग्या नगविला (Tukya Tukvila Nagya Nagvila), कुटुंब (Kutumb), कोकणस्थ (Kokanasth) कॅपेचीनो (Cappuccino), हू तू तू (Hu Tu Tu), मर्डर मेस्त्री (Murder Mestri), कॅरी ऑन देशपांडे (Carry On Despande), ढोलकी (Dholki), दी शॅडो (The Shadow), मोहर (Mohar), भविष्याची ऐशी तैशी (Bhavishyachi Aishi Taishi), वज्र (Vajra) या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

तर, तीन बायका फजिती ऐका (Teen Baika Fajiti Aika), जलसा (Jalsa), फक्त लढ म्हणा (Fakt Ladh Mhana), एकता एक पॉवर (Ekta Ek Power), पोलीस लाईन (Police Line), स्माइल प्लिज (Smile Please), तु फक्त हो म्हण ( Tu Fakt Ho Mhan) या चित्रपटांमध्ये तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. तिच्या ‘वाट बघतोय रिक्षवाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. इतकंच नव्हे तर मराठीतील निलेश साबळे (Nilesh Sabale) लिखित चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातसुद्धा तिने २०१४ साली काही काळ काम केले. 

इतकंच नव्हे तर तिने कॅरी ऑन देशपांडे (Carry On Despande) या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच, संस्कृती कलादर्पण (Sanskruti Kaladarpan) तर्फे तिला २०१६ आणि २०२३ मध्ये स्टाईल आयकॉन हा पुरस्कार देखील देण्यात आला होता. 

मानसी नाईकचे खाजगी आयुष्य…

मानसी नाईकचे हिने  १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेराशी लग्न केले.
Image Source: Hindustan Times Marathi News

आपल्या नृत्यामुळे सतत चर्चेत असणारी ही अभिनेत्री अलीकडेच तिच्या खाजगी आयुष्यामुळेही प्रकाशझोतात आली होती. मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण करण्यासाठी मुंबईत आलेली मानसी नाईक ही मुलाची पुण्याची आहे. तिचा जन्म ३ फेब्रुवारी १९९२ रोजी पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून तिने मनोरंजन क्षेत्रात येण्याचे ठरवले. १९ जानेवारी २०२१ रोजी मानसीने बॉक्सर प्रदीप खरेरा (Pradip Kharera) सोबत लग्नगाठ बांधली. पण, लग्नाच्या एका वर्षात ते विभक्त झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा मानसी नाईक राहुल किस्मतरावला (Rahul Kismatrao) डेट करत असल्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे.