News

छ्त्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लवकरच भारतात

Waghnakh
शिवाजी महाराजांनी वाघनखं भारतात दाखल

छ्त्रपती शिवाजी महाराजांची (Chhatarapati Shivaji Maharaj) वाघनखं लवकरच भारतात आणू असा दावा राज्य सरकारने केलेला असताना, अखेर महाराजांची बहुप्रतिक्षित वाघनखं राज्यात दाखल झाली आहेत. ही वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांच्या कालवधीसाठी आणण्यात आली आहेत. काल ही नखं राज्याची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाली तर, त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात या ऐतहासिक नखांना स्वराज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या सातारा (Satara) येथे नेण्यात आले. साताऱ्यातील संग्रहालयात ही नखे तब्बल १० वर्षांसाठी सर्व नागरिक, शिवभक्त आणि इतिहासकारांना पाहता येणार आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते आज दिनांक १९ जुलै रोजी साताऱ्यात मोठ्या भव्य दिव्य पद्धतीत हा सोहळा पार पडणार आहे. तसेच वाघनखांच्या स्वागताच्या सोहळ्याला शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील उपस्थित असणार आहेत. आज अगदी दिमाखात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात शिवकालीन इतर शस्त्र आणि या वाघनखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सातारकरांना ही नखं पाहता येणार आहेत.

लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत. तीन वर्षाच्या कराराअंतर्गत ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जात असून, ती कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. ही वाघनखं राज्यातील ४ मुख्य संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. ज्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या संग्रहालयांचा समावेश आहे.

शिवाजी महाराजांच्या वाघनखांसाठी नेमका किती खर्च झाला?

शिवाजी महाराजांच्या वाघनखांसाठी नेमका किती खर्च झाला?

वाघनखं भारतात आणण्यासाठी राज्यसरकारने नेमका किती खर्च केला आहे? असा सवाल उपस्थित करताच, यावर उत्तर देताना आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे, त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. तसेच, वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा खर्च फक्त १४ लाख ८ हजार रुपये इतकाच झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले होते.

पण, राज्यसरकारने ही नखं लंडनहून महाराष्ट्रात आणण्याआधी ही वाघनखं महाराजांची नाहीत, असा दावा कोल्हापूरमधील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला होता. सावंत यांनी पत्रकार परिषद बोलवत हा निर्णय घेतला होता. मूळ वाघनखं साताऱ्यात असतानाही, राज्यसरकार उगीचच का भाडेतत्त्वावर लंडनमधून वाघनखं महाराष्ट्रात आणत आहे असा सवालही त्यांनी केला होता.

About the author

Pradnya Mestri

Add Comment

Click here to post a comment