Politics

महाविकास आघाडीत धुसफूस, पुण्यातील 6 जागांवरून ठाकरे- पवार भिडणार

ठाकरे आणि पवार भिडणार पुणे विधानसभा मतदारसंघांवरून?
ठाकरे आणि पवार भिडणार पुणे विधानसभा मतदारसंघांवरून?
विधानसभेच्या जागांवरून ठाकरे आणि पावरांमध्ये होणार मतभेत?

पुणे: महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचे महविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. पण, त्याचवेळी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने (Sharad Pawar Camp) बैठक घेतली आणि पुण्यातील (Pune) ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असायला हवेत असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ही बैठक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने खूप महत्वाची समजली जाते आहे. ही बैठा राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पार पडली. पक्षाची जिंकून येण्याची ताकद, नेमके उमेदवार आणि पक्षाची ताकद या निकषांवर पुणे शहरातील ८ जागांचा आढावा घेण्यात आला. शहरातील वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, हडपसर आणि पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या संदर्भातील अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला. या बैठकीसाठी पक्षाचे मोठे-मोठे नेते उपस्थित होते.या बैठकीस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार सौ.वंदनाताई चव्हाण, माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड़, जिल्हा अध्यक्ष माज़ी आमदार श्री. जगनाथबाप्पू शेवाळे, माज़ी आमदार कुमारभाऊ गोसावी, अंकुशराव काकडे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाकरे गटाने केला पुण्यातील ६ जागांवर दावा

ठाकरे आणि पवारांमध्ये विधानसभेच्या जागांवरून वाद
Image Source: Mid-day

पुण्यातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, पुणे कँटोन्मेंट कसबा आणि हडपसर या सहा जागांवर ठाकरे गटाने दावा केल्यामुळे आता महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्हं दिसत आहेत. पुण्यातील ८ जागांपैकी ६ जागा मिळाव्यात अशी पवार आणि ठाकरे गटाने वरिष्ठांकडे मागणी केली आहे. मतदारसंघावरून होणाऱ्या या धूसफुसीमुळे जागावाटप लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्ट्राइक रेटमुळे राष्ट्रवादी मागणार अधिकच्या जागा…

राष्ट्रवादी मागणार १०० जागा?
Image Source: IndiaToday

लोकसभेच्या स्ट्राइक रेटमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जास्त जागा वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीकडे १०० जागांचा प्रस्ताव ठेवू शकते. या महिन्यात जयंत पाटील विधानसभानिहाय जागांची माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे.