Finance

मुंबई ठरले आशियातील 21वे तर दिल्ली 30वे श्रीमंत शहर

मुंबई आणि दिल्लीने आशियातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत २१वे आणि ३०वे स्थान अनुक्रमे मिळवले आहे.
मुंबई आणि दिल्लीने आशियातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत २१वे आणि ३०वे स्थान अनुक्रमे मिळवले आहे.
मुंबई आणि दिल्लीने आशियातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत २१वे आणि ३०वे स्थान अनुक्रमे मिळवले आहे.

‘स्वप्नांचे शहर’ मुंबई हे राहणीमानाच्या अत्यंत उच्च खर्चामुळे नेहमीच अनेकांच्या आवाक्याबाहेर राहिले आहे! केवळ महागडी रिअल इस्टेटच नाही तर मुंबईतील वस्तूंच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मर्सरच्या 2024 च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेनुसार(Mercer’s cost of living survey), मुंबईतील दैनंदिन खर्च, ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक आणि घरांचे भाडे यासाठीचा खर्च उच्च मानला जात आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबईतल्या महागाईत देखील खूप वाढ झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईने घाठलं १३६वं स्थान

मुंबईने महागाईच्या बाबतीत ११ स्थानांनी १३६वा क्रमांक मिळवला आहे, तर दिल्ली ४ स्थानांनी १६४व्या स्थानावर पोहोचली आहे.
Image Source: Britannica

आंतरराष्ट्रीय स्तरावर, मुंबईने महागाईच्या बाबतीत ११ स्थानांनी १३६वा क्रमांक मिळवला आहे, तर दिल्ली ४ स्थानांनी १६४व्या स्थानावर पोहोचली आहे. याउलट, चेन्नई पाच स्थानांनी घसरून १८९ व्या, बेंगळुरू सहा स्थानांनी घसरून १९५ व्या आले आहे. तर हैदराबादने २०२ वे स्थान कायम राखले आहे. पुणे आठ स्थानांनी २०५ व्या स्थानावर आले आहे आणि कोलकाता चार स्थानांनी वाढून २०७ व्या स्थानावर आले आहे.

२०२३ मध्ये, मुंबईने रँकिंगमध्ये २० स्थानं घसरून १४७व्या क्रमांकावर घसरण नोंदवली. अहवालात मुंबईच्या वाढत्या राहणीमानाच्या खर्चाचे श्रेय विकसित होत असलेल्या आर्थिक घटकांना देण्यात आले आहे. दिल्लीने २०२३ मधील १६९ व्या क्रमांकावरून १६४ व्या स्थानावर, तर कोलकाता २११ व्या वरून २०७ व्या स्थानावर आणि पुणे २१५ वरून २०५ व्या स्थानावर पोहोचले. याउलट, चेन्नई १८४ व्या वरून १८९ व्या, बेंगळुरू १९८ व्या वरून १९५ व्या, आणि हैदराबाद २०२ व्या स्थानावर स्थिर राहिले. हे चढउतार भारताच्या शहरी अर्थव्यवस्थेचे गतिमान स्वरूप आणि जागतिक आणि स्थानिक दोन्ही आर्थिक प्रभावांबद्दलची त्यांची संवेदनशीलता ठळक करतात, असे अहवालात म्हटले आहे.

मुंबई ठरले आशियातील २१वे महागडे शहर

प्रवासी लोकांसाठी आशियातील सर्वात महागड्या शहरांमध्ये मुंबई २१ व्या क्रमांकावर आहे,
Image Source: UnequalScenes

प्रवासी लोकांसाठी आशियातील सर्वात महागड्या शहरांमध्ये मुंबई २१ व्या क्रमांकावर आहे, तर विभागातील सर्वेक्षण केलेल्या स्थानांमध्ये दिल्ली ३० व्या स्थानावर आहे.”जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड देताना, भारत आमच्या २०२४ कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेमध्ये (Cost of Living) मोठ्या प्रमाणात लवचिक राहिला आहे. मुंबईच्या क्रमवारीत वाढ झाली असली तरी, भारतीय शहरांची एकूण परवडणारीता बहुराष्ट्रीय संस्था किंवा जागतिक प्रतिभा आकर्षित करू पाहणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी एक महत्त्वाचा फायदा आहे. देशांतर्गत मागणी आणि भक्कम सेवा क्षेत्रामुळे भरभराट होत असलेली आमची अर्थव्यवस्था जागतिक प्रतिभेसाठी एक स्थिर वातावरण देते,” मर्सर येथील इंडिया मोबिलिटी लीडर राहुल xशर्मा म्हणाले.