Politics

आमच्या श्रद्धेत तुम्ही हस्तक्षेप करू नका म्हणत रणजित सावरकरांनी केले ओम प्रमाणपत्राचे वाटप

हिंदुंनी हिंदूंच्या श्रद्धा जपाव्यात आणि इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका रणजित सावरकर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मांडली आहे.
हिंदुंनी हिंदूंच्या श्रद्धा जपाव्यात आणि इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका रणजित सावरकर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मांडली आहे.
हिंदुंनी हिंदूंच्या श्रद्धा जपाव्यात आणि इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका रणजित सावरकर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मांडली आहे.

अलीकडच्या काळात धार्मिक वादांना वरचेवर तोंड फुटत असताना आता वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी हिंदू देवस्थानातील प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रसाद विक्रेत्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ देणार असल्याचे सांगितले. ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) परिसरातील प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. हिंदूंच्या भावना जपल्या जाव्यात, त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचू नये आणि प्रसादाची शुद्धता जपण्यासाठी श्रद्धा जिहाद विरोधात (Shraddha Jihad) हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रमाणपत्र वाटपाच्यावेळी तिथे रणजित सावरकर (Ranjit Savarkar), धर्म अभ्यासक अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) आणि अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) उपस्थित होते.

ओम प्रमाणपत्र (Om Certificate) असणाऱ्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यास त्या शुद्ध मिळतील, असाही दावा त्यांनी केला आहे. हिंदुंनी हिंदूंच्या श्रद्धा जपाव्यात आणि इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका रणजित सावरकर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मांडली आहे. पण, मग यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले का प्रश्न हा उपस्थित होत आहे. तसेच, या कृतीतून संघटना सरकारी यंत्रणांवर अविश्वास दाखवू पाहत आहेत का? अशीही शंका व्यक्त होत आहे.

धर्मचार्यांनी ठरवले शुद्धतेचे निकष: रणजित सावरकर

प्रसाद भेसळ केली गेल्याच्या बातम्या सतत कानी पडत आहेत. रणजित सावरकर
Image Source: sanatanprabhat.org

प्रसादात वेळोवेळी होणाऱ्या भेसळीबाबत बोलताना रणजित सावरकर म्हणाले की, प्रसाद भेसळ केली गेल्याच्या बातम्या सतत कानी पडत आहेत. फक्त नकली किंवा भेसळयुक्त पदार्थाचं नाही तर गायीच्या चरबीपासून पेढे बनवून त्यांचे वितरण केले जात आहे. त्यामुळे शुद्धेचे निकष ठरवणे गरजेचे आहे आणि धर्मचार्यांनी ते ठरवले आहेत. ओम प्रतिष्ठान ही राजकारण विरहित संघटना आहे आणि याच संघटनेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे रक्षण करणार ही संघटना आहे. 

आमच्या श्रद्धेत कुणीही हस्तक्षेप करू नये

आम्हाला हे करण्यासाठी कुणी अधिकार देण्याची गरज नाही. आम्ही आमच्या धर्माचे रक्षण करणार जेव्हा सरकारला जाग येईल तेव्हा त्यांनी धर्माचे रक्षण करावे. तसेच हिंदू धर्मानुसार प्रसाद शुद्ध आहे की नाही हे सांगणारे निकष फूड आणि ड्रग्स विभागाकडे नाहीत. त्यामुळे हे काम आम्हाला करावे लागत आहे. ही धार्मिक तत्वाची भेसळ आहे आणि रोखणं गरजेचं आहे. 

आमच्या श्रद्धेत कुणीही हस्तक्षेप करू नये
Image Source: ThePrint

तुम्ही तुमचा धर्म पाळा आणि आम्हाला आमचा पाळू द्या. आमच्या श्रद्धेय कुणीही हस्तक्षेप करू नका. रोजगार काय सरकारने कुणालाही द्यावा, मुसलमान काय प्रत्येक व्यक्तीला द्यावा. पण, प्रत्येक ठिकाणी हिंदू- मुसलमान करणं चुकीचं आहे. आमचा प्रसाद, पूजेचे साहित्य बनविण्याचा अधिकार मुस्लिम लोकांना नाही.

About the author

Pradnya Mestri

Add Comment

Click here to post a comment