Table of Contents
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यामुळे, यापूर्वी बहुमत मिळालेल्या महाराष्ट्रात महायुती बरीच मागे आली आहे. त्यामुळे महायुतीतील सर्वच पक्षांनी मोठ्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या चर्चा, बैठका आणि चाचपण्या सुरु झाल्या आहेत. यावेळी भाजपला एकहाती सत्तेत येता आले नाहीये आणि त्यामुळे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजप त्याच्या मित्र पक्षांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत आणि महायुतीत या जागांचे वाटप कसे होणार? याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे, आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) यासंबंधी एक मोठे विधान केले आहे. आता हे विधान कोणते हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
Ajit Pawar यांनी केला शिक्कमोर्तब
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्षांमध्ये निवडणुकीची तयारी जोमाने सुरु असल्याचे दिसून येत आहे, आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील निवडणुकीसंबंधी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. काही काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ८० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिक्कामोर्तब स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता शिक्कामोर्तब केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे आणि ८५ जागांवर आपले उमेदवार उतरवणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
शिंदेगटाला किती जागा मिळणार?
राज्यात विधासभेच्या एकूण २८८ जागा आहेत आणि त्यातल्या ८५ जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असेल तर २०३ जागा उरतात. सध्या महाराष्ट्रात भाजपचे १०६ आमदार आहेत आणि त्याचबरोबर १० अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. त्यामुळे २०३ जागांपैकी ११५ ते १२० जागा या भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उरलेल्या ८० – ८५ जागांवर एकनाथ शिंदे गट निवडणूक लढवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Add Comment