Entertainment

गाजलेले जुने movies ‘या’ तारखेला होणार रिलिज

Cinema hall India
जुने movies आता पुन्हा पाहता येणार

चित्रपट हा अनेकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. चित्रपट (Movie) म्हणजे सामान्य माणसाचं आयुष्य लार्जर देन लाईफ करून अनोख्या पद्धतीने लोकांसमोर मांडणारं माध्यम. आता जरी ओटीटी हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असला, तरी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट (Movie) पाहण्याची मजा काही औरच असते. पण, अनेकदा काय होत की, आताच्या काळात भाव खात असलेले जुने चित्रपट किंवा मग पूर्वीच्या काळी हिट ठरलेले आणि, आताही प्रसिद्ध असलेले अनेक चित्रपट (Movie) चित्रपटगृहात पाहण्याची लोकांना संधी मिळत नाही.

पण, आता अशाच काही प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एकेकाळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले आणि लोकांची वाहवाह मिळवलेले चित्रपट आता पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत. ३० ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी हे चित्रपट (Movie) सर्वांना पाहता येणार आहेत. तसेच एक महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व चित्रपटांमध्ये एका मराठी चित्रपटाचा पण समावेश आहे.

चित्रपट नवे असो व जुने प्रत्येक चित्रपटाचा (Movie) एक चाहतावर्ग असतो. मग तो ‘गँग ऑफ वासेपुर’ असुदे किंवा मग ‘रहना है तेरे दिल मैं’. आताच्या काळात असेही काही चित्रपट आहेत ज्यांनी अजूनही लोकांना वेड लावलंय. 2012 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गँग ऑफ वासेपुर’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. लोकांनी या चित्रपटाला खूप पसंती दिली. हाच सत्यघटनेवर आधारित असलेला आणि गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारा चित्रात पुन्हा लोकांच्या भेटीस येणार आहे.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल मैं’ या चित्रपटाने देखील तरुणांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. २० वर्षांचा काळ उलटूनही आर माधवनने साकारलेला मॅडी आणि दिया मिर्झाने साकारलेली रीना अजूनही अनेकांच्या लक्षात आहेत. हा चित्रपटसुद्धा सर्वांना शुक्रवारी पाहता येणार आहे.

हिंदी movies सह या मराठी चित्रपटाचाही आहे समावेश…

हिंदी movies सह या मराठी चित्रपटाचाही आहे समावेश…
Image Source: Koimoi

हिंदी चित्रपटांसह (Movie) मराठी आणि कन्नड चित्रपटांनीही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 2018 साली प्रदर्शित झालेला तुंबाडही प्रेक्षकांच्या अत्यंत पसंतीस उतरला. तुंबाड हा एक भयपट असून, त्यातला थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता यावा म्हणून तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच कन्नडमधील करिया हा 2003 साली प्रदर्शित झालेला चित्रपट (Movie) देखील पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे जुने चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. त्याला प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘लैला मजनू’ चित्रपट (Movie) प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेचा विषय ठरला. 2018 साली पहिल्यांदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने याच चित्रपटातून सिनेविश्र्वात पदार्पण केले होते.