Politics

आदल्या जन्मी पाप करतो तो पुढील जन्मी साखर कारखाना टाकतो किंवा वर्तमानपत्र काढतो: Nitin Gadkari

Nitin Gadkari addressing at the inauguration of the 29th National Road Safety Week 2018 in New Delhi removebg preview
Nitin Gadkari यांनी केले मोठे वक्तव्य

जो माणूस आदल्या जन्मी पाप करतो तो पुढील जन्मी साखर कारखाना टाकतो किंवा वर्तमानपत्र काढतो, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) अमरावती येथील एका वर्तमानपत्राच्या महोत्सवी कार्यक्रमात म्हणाले. त्याच्या या विधानामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुढे म्हणाले की, राजकारण बदलत चाललं आहे, लोकशाही 4 पिलरवर उभी आहे , पण त्या चार स्तंभाचा समतोल राहिला नाही तर लोकशाही धोक्यात येते. ज्यावेळी देशावर संकट आले तेव्हा पत्रकारांनी देशाला मार्गदर्शन केले आहे. एखाद्याच्या विरोधात जर वृत्तपत्रात बातमी छापली तर लगेच संपादकांना फोन जातो. जे काही चुकीचं आहे ते मीडियाच छापण्याच काम आहे, ते आपण स्वीकारण्याच काम आहे. चुकीचं लिहण्याचा देखील अधिकार पत्रकारांना आहे, लिहण्याचा अधिकार संपुष्टात येता कामा नये, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

पुढे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले,आज आपल्या देशात विचार भिन्नता ही समस्या नाही. विचार शून्यता ही समस्या आहे. साधारण एक प्रथा आहे. जी आपली विचारधारा होती, त्या विचारधारेप्रमाणे बाळासाहेब मराठे यांनी हिंदूस्तानला दिशा दिली. नवीन आमदार बनलो होते. आज हिंदूस्तानने जी पत्रकारीता जोपासली आहे. ती पत्रकारीता आणि विचार आपल्या सर्वांकरता आदरणीय आहेत.

इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षा आपली लोकशाही प्रगल्भ आहे. त्यामध्ये वर्तमानपत्राचं कार्य लोकप्रबोधनाचं आहे. मला आठवतं ज्यावेळी देशावर संकट येतं. तेव्हा पत्रकारांनी केलेलं मार्गदर्शन कोणीही विसरु शकत नाही. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना वृत्तपत्राच्या ठणकावून सांगितलं होतं. स्वातंत्र्यानंतरची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये बरच अंतर पडलेलं आहे. लोकशाही सदृढ झाली पाहिजे, असंही नितीन गडकरी (Nitin Gadkari) यावेळी म्हणाले.

About the author

Pradnya Mestri

Add Comment

Click here to post a comment