Table of Contents
नीट पेपर फुटीप्रकरणामुळे (NEET Paper Leak Case) संपूर्ण देशात खळबळ माजली होती. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांमध्ये बरीच तफावत दिसल्यामुळे जागोजागी विद्यार्थ्यांकडून लागलेल्या निकालाचा विरोध होऊ लागला, आणि आता याच नीट पेपर फुटीप्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे. या पेपर फुटीच्या घोटाळ्याचे लातूर कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात नांदेडच्या एटीएस (ATS) पथकाने धडक कारवाई करत घोटाळ्याशी संबंधीत एका शिक्षकाला अटक केली आहे, तर दुसऱ्या शिक्षकाला पकडण्यात पथक अपयशी ठरले आहे. या प्रकरणी एकूण चार शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, फरार शिक्षकाला पकडण्यासाठी एटीएसचे एक पथक देखील रवाना झाले आहे.
NEET Paper Leak प्रकरणी दोन शिक्षकांना अटक
नीट पेपरफुटी प्रकरणी शनिवारी २२ जून रोजी नांदेड एटीएस (ATS) पथकाने जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली. काही तासांच्या चौकशीनंतर दोन्ही शिक्षकांना सोडुन देण्यात आले. मात्र काही तासांनंतर लातूर पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा तपासाला सुरुवात केली आणि त्यानंतर एका शिक्षकाला ताब्यात घेतले. पण, याच दरम्यान दोषी असलेला दुसरा शिक्षक मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. फरार झालेल्या शिक्षकाचे नाव संजय जाधव असे आहे आणि पोलिस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिक्षकाचे नाव जलील उस्माखा पठाण असे आहे.
नीट प्रकरणातील फरार झालेला शिक्षक संजय जाधव (Sanjay Jadhav) हा सध्या सोलापूर येथील टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काम करत असून, ती मूळचा बोधी तांडा तालुका चाकूर येथील आहे. तर ताब्यात घेतलेला दुसरा शिक्षक जलील उस्माखा पठाण अंबेजोगाई रोड येथील रहिवासी असून कातपुर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
NEET घोटाळ्याचे लातूर कनेक्शन
वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेसाठी दरवर्षी अनेक विद्यार्थी मोठ्या जोमाने तयारी करत असतात आणि त्याच परीक्षेत पेपरफुटीचा घोटाळा झाल्याचे एक ना अनेक आरोप देशभरातील विद्यार्थी करू लागले. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली. तसेच या घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन तपासत असताना घोटाळ्याचे लातूर पॅटर्न समोर आले. लातूर जिल्ह्यातील बरीच मुलं जेईई आणि नीट या स्पर्धात्मक परीक्षांसाठी खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असताना हा प्रकार समोर आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लातूरचा या घोटाळ्याशी काही संबंध आहे का? हे तपासत असताना दोन जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक नांदेड एटीएस पथकाच्या हाथी लागले. मात्र काही तासांच्या चौकशीतून काही निष्पन्न न झाल्यामुळे त्यांना सोडण्यात आले. पण लातूर पोलिसांनी केलेल्या तपासात एटीएसने पकडलेले शिक्षकच दोषी आढळल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याचे लातूर पोलिसांनी ठरवले आणि त्यातील जलील पठाण या शिक्षकाला ताब्यातील घेतले. पण, या घोटाळ्यातील दुसरा दोषी शिक्षक संजय जाधव याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आणि तो शिक्षक फरार झाला. आता पोलिसांनी या प्रकरणी शोध घेण्यासाठी कसून कारवाई करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे त्या शिक्षकाचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Add Comment