Table of Contents
महाराष्ट्रात कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चारही मतदार संघाच्या निवडणूका २६ जुलै रोजी पार पडल्या आणि काल चारही निवडणूक संघाचे निकाल जाहीर झाले असून कोणत्या मतदार संघात झालेली लढत जास्त चुरशीची होती? कोणत्या मतदार कुणी कोणाला किती मतांनी पछाडलंय घेऊया जाणून.
कोकण पदवीधर निवडणूक
कोकण पदवीधर निकालाकडे नजर टाकली असता, ३२१ कोकण पदवीधर मतदार संघातील मतमोजणी एकूण ८ फेऱ्यांमध्ये पार पडली. एकूण 1 लाख 43 हजार 297 मतपत्रिकांमधून हि मोजणी करण्यात आली. कोकण मतदार संघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी ५९००० मतांनी जिंकत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी विजयाची हॅट्रिक केली असून, काँग्रेसच्या रमेश किर यांचा त्यांनी 1 लाख 719 मतांनी पराभव केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत झाली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत.
मुंबई शिक्षक आणि पदवीधर निवडणूक
मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघाबद्दल सांगायचं झालं तर, मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय मिळवला. तर शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारली आहे. अभ्यंकर यांनी 4 हजार 83 मतांनी विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
नाशिक शिक्षक निवडणुक
नाशिक मतदार संघात झालेली निवडणूक हि सुद्धा मोठ्या चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली. एकूण २१ उमेदवार नाशिक मतदार संघाच्या रिंगणात उभे असताना महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत पार पडली. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे आणि 64 हजार 848 मतांपैकी मते वैध ठरवण्यात आली. गेल्या 24 तासांपासून मतमोजणी सुरू होती.
पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर होते. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत होतं. पण, अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवला. विजयासाठी 31 हजार 576 चा कोटा निश्चित करण्यात आला होता. विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक होती.
यंदाची पदवीधर निवडणूक हि फार चुरशीची ठरली कारण राज्यात झालेल्या राजकीय भूकंपामुळे प्रत्येक पक्षाने आपला एक प्रतिनिधी प्रत्येक मतदार संघात उभा केला होता. कोकण मतदार संघात विजय मिळवत भाजपच्या निरंजन डावखरे यांनी यंदा विजयची हॅट्रिक केली तर, गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा गड असलेला मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ अनिल परब आणि जगन्नाथ अभ्यंकर यांच्या विजयामुळे शिवसेनेला राखता आला. तर तिसरीकडे नाशिक मतदारसंघात घडलेल्या गैरप्रकारानंतर देखील मतमोजणी प्रक्रिया नीट पार पडली आणि महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांचा विजय झाला आहे.
Add Comment