Table of Contents
सध्या मराठी मालिकविश्र्वात वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका, नवीन कथा, अनुभवी कलाकार आणि नव्या विषयांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अलीकडे लोक फक्त नायक आणि नायिकांसाठीच नव्हे अगदी खलनायकासाठी सुद्धा एखादी मालिका आवडीने पाहतात. मालिका यशस्वी होण्यासाठी फक्त नायक नायिकाच नव्हे तर खलनायक सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. असाच एक अनोखा आणि प्रयोगशील विषय घेऊन ‘ तू भेटशी नव्याने‘ (Tu Bhetashi Navyane) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेत सुबोध भावे (Subodh Bhave) आणि शिवानी सोनार (Shivani Sonar) नायक आणि नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर प्रिया मराठे (Priya Marathe) ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या नव्या मालिकेचं वेगळेपण म्हणजे यात एआयचा (AI) करण्यात आलेला वापर. कारण ही मालिका एका प्रेमकथेवर आधारित असून यात चाळिशीतला आणि वीशीतला अशा दोन्ही वयातला सुबोध भावे प्रेक्षकांना दिसणार आहे. एआयचा वापर करून तयार करण्यात येणारी ही भारतातील पहिली मालिका ठरणार. तसेच ही मालिका सोनी मराठीवर येत्या ८ जुलै पासून रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन अजय मयेकर यांनी केले आहे.
Priya Marathe साकारणार खलनायिकेची भूमिका
तू भेटशी नव्याने (Tu Bhetashi Navyane) या मालिकेत प्रिया मराठे या खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या साकारणार आलेल्या भूमिकेचे नाव रागिणी अग्निहोत्री असे असणार आहे. या मालिकेत त्या एका प्राध्यापिकेच्या भूमिकेत आहेत, जी अभिमन्यू राजेशिर्के अर्थातच सुबोध भावेच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असते. आता या मालिकेत रागिणी काय काय षडयंत्र रचणार? तिच्यामुळे मालिकेत नेमकी काय वळणं येणार? आणि अभिमन्यू आणि गौरीच्या आयुष्यात ती काय उलथापालथ करणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं
प्रिया मराठेच्या (Priya Marathe) भूमिकेमुळे मालिकेत रंजक वळण येऊ शकते आणि त्यामुळे ती ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे ती सांगते. स्वतःच्या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया म्हणाली की, जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्त्वाची आहे याकडे माझं लक्ष असते. मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली.
Add Comment