News Politics

लंडनच्या संग्रहालयातुन भारतात येणारी वाघनखे शिवरायांची नाहीत, इतिहासकार Indrajit Sawant यांचा दावा

Indrajit Sawant यांचा दावा खरा की खोटा?
Indrajit Sawant यांचा दावा खरा की खोटा?
Indrajit Sawant यांनी केला भारतात येणारी वाघनखं शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा.

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक सुरु होणार आहेत, आणि अशातच राजकारणी वेगवेगळी आश्वासनं देऊन जनतेला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. कुणीतरी धार्मिक अजेंडा वापरतोय, कुणीतरी आर्थिक अजेंडा तर वापरू पाहतोय, तर कुणी जातीयवादाचा अजेंडा वापरतोय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत मानले जातात, आणि बऱ्याच दिवसांपासून शिवरायांची वाघनखे लंडनहून महाराष्ट्रात आणणार असल्याचे अनेक राजकीय नेते सांगत आहेत. पण त्यांचा हा दावा खोटा ठरवत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी एक मोठा दावा केला आहे. आता तो दावा काय घेऊया जाणून.

काय म्हणले Indrajit Sawant?

काय म्हणले Indrajit Sawant?
Image Source: Dainik Prabhat

“व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची वाघनखं घेऊन येणार, असा दावा राज्य सरकारतर्फे केला जात आहे. मात्र ते संग्रहालय स्वतः सांगतं आहे की, ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अधिकारी करारासाठी गेले होते तेव्हाही त्यांनाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ही वाघनखं शिवरायांची नाहीत. ही वाघनखं भारतात घेऊन गेल्यानंतर तुम्ही जिथे ती प्रदर्शित कराल, तिथे ‘ही वाघनखं शिवरायांची नाहीत, त्याच्या सत्यतेविषयी खात्रीपूर्वक सांगता येत नाही, अशा पद्धतीचं पत्रंही तिथे प्रदर्शित करा, असंही संग्रहालयाने अधिकाऱ्यांना आणि प्रस्तुत मंत्र्यांना सांगितलं. असं असतानाही राज्यातील मंत्री आणि अधिकारी धादांत खोटं बोलून जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती त्यांचीच आहे असं सांगत त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.”, असं इंद्रजीत सावंत म्हणाले.

“छत्रपती शिवरायांची वाघनखं ही प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफला भेट दिली असं सांगितलं जातं. मात्र प्रतापसिंह महाराजांसारखा अत्यंत शिवप्रेमी माणूस ही वाघनखं देईलच कसा? शिवाय ग्रँट डफ भारतातून निघून गेल्यानंतरही प्रतापसिंह महाराजांनी छत्रपती शिवरायांची वाघनखं ही अनेकांना दाखवली आहेत. अशा परिस्थिती ते ती वाघनखं कशी काय देतील? मूळात ती वाघनखं बाहेर जातीलच कशी?” असा प्रश्न इंद्रजीत सावंत यांनी विचारला आहे.

व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाने पत्रात काय म्हटलं आहे?

व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाने पत्रात काय म्हटलं आहे?
Image Source: Saam Tv – Sakal

म्युझियमने दिलेले पत्र

प्रति इंद्रजीत सावंत,

तुमचं पत्र मिळालं. तुम्ही अॅड्रियन ग्रँट डफ यांच्याबाबत आणि त्यांना भेट देण्यात आलेल्या वाघनखांबाबत संग्रहालयाकडे विचारणा केलीत. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला आहे, त्या वंशजांचे अनेक उल्लेख आमच्याकडे आहेत. अॅड्रियन ग्रँट डफ हा जो उल्लेख तुम्ही केलात त्यांचा मृत्यू १९१४ मध्ये झाला. ते जेम्स ग्रँट डफ यांचे नातू होते. ज्या अॅड्रियन यांनी संग्रहालयाला वाघनखं भेट दिली त्यांचा मृत्यू २०१९ मध्ये झाला. आमच्याकडे असलेल्या उल्लेखाप्रमाणे २८ ऑक्टोबर १९७१ या दिवशी ही वाघनखं संग्रहालयात आली.

आम्ही ही बाब मान्य करतो की, सदर वाघनखांबाबत संभ्रम आहे. जी वाघनखं व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत, ती छत्रपती शिवरायांची असून त्याच वाघनखांनी त्यांनी अफझल खानाचा वध केला का याबाबत संभ्रम आहे. याची आम्ही पारदर्शीपणाने महाराष्ट्र सरकारला कल्पना दिलेली आहे. तसंच आम्ही त्यांना हेदेखील सांगितलं आहे की, तुम्ही ज्या ठिकाणी ही वाघनखं लोकांना पाहण्यासाठी ठेवाल तिथे ही वाघनखं शिवरायांची आहेत का, याविषयी अनिश्चितता आहे अशी माहितीही तिथे ठेवावी. असं करण्यास त्यांची काहीच हरकत नसावी, अशी अपेक्षा आहे.