News Politics

Vishalgad encroachment प्रकरणी Abu Azmi काय म्हणाले?

whatsapp image 2023 04 10 at 15.37.35
Vishalgad प्रकरणी Abu Azmi यांची प्रतिक्रिया चर्चेत

राज्यात सध्या विशाळगड (Vishalgad) अतिक्रमणाचा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. या मुद्द्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलच तापलंय. विशाळगडावर (Vishalgad) झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या जमावात आणि तेथील स्थानिकांमध्ये झालेल्या वादामुळे गावात दगडफेक आणि इतर हिंसक घटना घडल्या. या हिंसक घटनांमुळे स्थानिक भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना, समाजवादी पार्टीचे (Samajvadi Party) नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनीही देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य केले आहे.

अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले, “दिवसाढवळ्या मस्जिद मध्ये जाऊन मस्जिद तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि बोलतात भडकवण्याचा प्रयत्न करतोय तर असं नाही आहे. कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने मंदिरात जाऊन असं कृत्य केलं असतं तर देशात आपत्ती आली असती. एवढा मोठा हल्ला झाला आहे , आणि कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल टेरेरिझमचा कायदा लागू करायला पाहिजे.”

विशाळगडावर (Vishalgad) झालेल्या दगडफेकीत अनेकांचे नुकसान झाले. त्यानंतर तेथील स्थानिक भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्याकरीता काही शिवभक्त गडावर गेले होते. त्यावेळी त्यांनी दगडफेक आणि तोडफोड केल्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी गडावर धाव घेत काही शिवभक्तांना अटक केली. तसेच स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatarapati) यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला.

लाडका भाऊ योजनेबद्दलही केले मतं व्यक्त

Vishalgad प्रकरणी Abu Azmi यांची प्रतिक्रिया
Image Source: Maharashtra Times

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजानेची घोषणा केली आहे. यावर अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले, “सरकार लाडका भाऊ योजना काढून, आता बेरोजगांना पैसे देणार फक्त दाखवण्याचं काम आहे. कारण आता काही दिवसामध्ये निवडणूक होणार आहे. हे सरकार काही काम करणार नाही.”