News

नालासोपारा येथे २२ वर्षांनी लागला केसचा छडा

Representative Photo 1715175326955
नालासोपारा येथे २२ वर्षांनी आरोपी गजाआड

मिरा भाईंदर पोलिसांनी ३२७ कोटींचे ड्रग्स पकडल्याची बातमी समोर आली असतानाच आता त्यांनी केलेल्या अजुन एका कौतुकास्पद कारवाईची माहिती समोर येत आहे. आता ही कौतुकास्पद कामगिरी कोणती? तर , तब्बल २२ वर्षांनी होती. पिडीत महिला ही नालासोपाऱ्यातील गाळा नगर येथील रहिवासी आहे. २ जानेवारी २ वाजताच्या सुमारास आरोपी राजू भुपनराय राठोड, धीरज ब्रम्हानंद गिरी आणि मायकल उर्फ राम शिरोमण पांडे यांनी पीडितेला रिक्षात कोंबून तिच्यावर बलात्कार केला तसेच तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. तसेच तिला मारहाण करत जीव मारण्याची सुद्धा धमकी त्यांनी दिली.

२ जुलै २००२ रोजी पीडितेने घडल्या घटनेसंबंधी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांना राजू भुपनराय राठोड, धीरज ब्रम्हानंद गिरी पकडण्यात यश आले मात्र मायकल उर्फ राम शिरोमण पांडे हा आरोपी त्यांच्या हातून निसटला. माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून या गुन्ह्यातील आरोपीचा पुन्हा शोध घ्यायला सुरुवात करण्यात आली.

मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल शेख यांच्या अंतर्गत एक पथक तयार करण्यात आले आणि एका महिन्याच्या प्रयत्नांनी मायकल हा नालासोपाऱ्यात रिक्षा चालवत असल्याचे समोर आले. ५ दिवसाचा सापळा रचून पोलीस पथकाने अखेर मायकल उर्फ राम शिरोमण पांडे उर्फ टिपू याला काल ३ जुलै २०२४ रोजी अटक केली. सादर आरोपी हा मछलीपुर उत्तरप्रदेश इथला असून तो इतकी वर्ष नालासोपाऱ्यातील गाला नगर येथील टीका महाराज मंदिरात राहत होता

पोलिसांनी ही केलेली ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असली तरी बलात्काराच्या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी २२ वर्ष लागल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील लेकिंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात महीलांसाबंधित गुन्हे सहज रित्या घडत आहेत.