Technology

पावसाळ्यात Mobile वापरायचाय? मग अशा करा या टीप्स फॉलो

monsoon tips
Mobile पावसापासून सुरक्षित ठेवण्याच्या काही टिप्स

पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुळसलधार पावसात रोज प्रवास करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे तर अजूनच हाल होतात. अशातच मुंबई आणि उपनगरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याचे दिसून येते. अशा वेळी पावसात बाहेर पडताना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची काळजी घेणे गरजेचे आहे. या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसना जरा जरी पाण्याचा स्पर्श झाला तरी ती खराब होण्याची शक्यता असते.

खासकरून या काळात मोबाईलची (Mobile) आवश्यक ती काळजी पावसाळ्यात घेणे गरजेचे आहे. त्यामुळं आता मोबाईलची (Mobile) काळजी कशी घ्यावी? हा प्रश्न तर प्रत्येकालाच पडला असेल. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सध्या स्मार्टफोनमध्ये डॉक्यूमेंट्स पासून ते मित्र-कुटुंबातील सदस्यांचे अशा अनेक गोष्टी सेव असतात. त्यामुळे पावसात अचानक फोन खराब झाल्यास एखाद्याची तारांबळ उडण हे साहजिक आहे. तर पावसाळ्यात फोन खराब होण्यापासून कसा सुरक्षित ठेवायचा हेच आपण आज जाणून घेऊया.

Mobile पावसाळ्यात सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:

Mobile पावसाळ्यात सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:
Image Source: The Economic Times

पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला एखाद्या स्टॉलवर किंवा मग मोबाइलच्या दुकानात मिळणारा वॉटरप्रूफ पाउच पावसाळ्यात अत्यंत उपयोगाचा ठरतो. त्यामुळे तुम्ही जर तो खरेदी केलात तर तुम्हाला आरामात भर पावसात सुद्धा mobile वापरता येणार आहे. या वॉटरप्रूफ पाउचमुळे पावसात तुम्ही चिंब भिजलात तरी तुमच्या मोबाईल जराही इजा पोहोचत नाही. वॉटरप्रूफ पाउच तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साइटवरून १०० ते ३०० रुपयात खरेदी करू शकता.

जर तुम्हाला पावसात गाणी ऐकत किंवा मग फोनवर बोलत चालायची सवय असेल तर ही सवय तुम्हाला महागात पडू शकते, आणि त्यामुळे तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो. पण, तुम्ही जर पावसाळ्यात वॉटर आणि डस्ट प्रूफ ईयरफोन्स आणि ईयरबड्सचा वापर केलात तर आरामात खिश्यात अथवा बॅगमध्ये मोबाईल ठेवून तुम्ही कुणाशीही संवाद साधू शकतो.

अनेकदा आपण काहीतर खरेदी करायला किंवा कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर अचानक पाऊस येतो. अशा वेळेस फोन कसा सुरक्षित ठेवावा? हे आपल्या लक्षात येत नाही. तर अशा वेळेस तुम्ही वृत्तपत्र अथवा पॉलिथिनने फोनला झाकू शकता. त्यामुळे पावसाचे पाणी तुमच्या मोबाईलमध्ये शिरणार नाही.

तसेच मान्सून दरम्यान तुम्ही रेनकोट वापरल्यास त्यात सहजरीत्या तुमचा मोबाईल ठेऊ शकता. तसेच तुम्ही पावसाच्या दिवसात कुठे अडकलात तर मग तुमचा मोबाईल सर्वप्रथम बंद करा. तसेच फोनचा स्पीकर, चार्जर पॉइंट आणि हेडफोन जॅक सारख्या गोष्टी रुमाल अथवा इतर गोष्टीने झाका, ज्यामुळे त्यात पाणी जाणार नाही आणि तुमचा मोबाईल खराब होणार नाही.