News

Uran Murder Case: Yashashri Shinde केसमध्ये मोठी अपडेट, पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

yashashri shinde murder case 1722228106967 16 9
Yashashri Shinde प्रकरणी एकाला घेतले ताब्यात

नवी मुंबईतील उरण (Uran) या भागात यशश्री शिंदेची (Yashashri Shinde) झालेल्या निर्घृण हत्येने सर्वांना हादरवून सोडले आहे. तिच्या या मृत्यूमुळे संपूर्ण देश हादरला आहे. देशभरातून या प्रकरणाचा निषेध केला जातोय. ज्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सूत्र हलवायला सुरुवात केली आहे. अशातच आता केसमध्ये एक नवा खुलासा झाला आहे. कर्नाटकातून मोहसिन नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यशश्री (Yashashri Shinde) या व्यक्तीशी सतत संपर्कात होती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Yashashri Shinde खूनप्रकरणी अजून एकावर संशय?

Yashashri Shinde खूनप्रकरणी अजून एकावर संशय?
Image Source: Loksatta

उरणमधील यशश्री शिंदेची (Yashashri Shinde) निर्घृणपणे एका तरुणाने हत्या केल्याचे प्रकरणं नुकतेच समोर आले. त्यानंतर या प्रकारचा वेगवेगळ्या अँगलने तपास करायला पोलिसांनी सुरुवात केली. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. याकरिता पोलिसांनी मोहसीन नावाच्या तरुणाला कर्नाटक राज्यातून अटक केली आहे. मोहसिनला कर्नाटकातून महाराष्ट्रात चौकशीसाठी आणले जाणार आहे. यशश्री शिंदे (Yashashri Shinde) हीची हत्या होण्यापूर्वी ती एका नंबरवर सातत्याने संपर्कात होती आणि तो नंबर मोहसीनचा असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

यशश्री शिंदे (Yashashri Shinde) हिच्या केस प्रकरण अजून एक नाव समोर येत आहे, आणि ते नाव म्हणजे दाऊद शेख याचं. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांनी दिलेल्या एका जबाबात त्याच्या नावाचा उल्लेख केला होता. तसेच या व्यक्तीकडून तिच्यावर मृत्युआधी बलात्कार झालाय का? याचाही तपास करण्याचा दबाव लोक पोलिसांवर टाकत आहेत.

त्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात एक नवी घटना समोर येत आहे. ती म्हणजे दाऊद शेख हा एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये यशश्रीचा पाठलाग करताना दिसत आहे. समोर आलेल्या फुटेजनुसार २५ जुलैला दुपारी यशश्री काळया रंगाची छत्री घेऊन जाताना दिसत आहे, आणि लगेच १० मिनिटांनी आरोपी तिच्या मागावर दिसत आहे. २५ जुलैला झालेल्या खुनानंतर तोही फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दाऊद शेख याने यशश्री शिंदे (Yashashri Shinde) १५ वर्षांची असताना एकदा तिच्यावर अत्याचार केले होते. दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर असून यशश्री १५ वर्षांची असताना तिला आपल्या जाळ्यात ओढून त्याने २०१९ साली तिच्यावर अत्याचार केले होते. त्यानंतर यशश्रीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार त्याला पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून, तुरुंगात टाकण्यात आले. पण, सुडाची भावना मनात ठेऊन परत एकदा त्याने यशश्रीचा पाठलाग केला. २५ जुलैला ती मैत्रिणीला भेटायला म्हणून पनवेल स्टेशनला जायला निघाली. त्यानंतर दाऊदने तिचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करत, तिचा खून केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय.