Table of Contents
महाराष्ट्राला छ्त्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या पराक्रमामुळे किल्ल्यांचा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्रातील इतिहासाचा किल्ले एक अविभाज्य भाग आहेत. पण, याचपैकी एका किल्ल्यावर अतिक्रमण करून अवैध प्रकार सुरू होते आणि हेच प्रकार थांबवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्याकडून आंदोलनाचा बडगा उगारण्यात आला.
किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण थांबवण्याच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे विशाळगडाच्या पायथ्याशी आणि विशाळगडावर असलेल्या गावांमध्ये खूप नासधूस झाली. ही निष्पाप माणसं होती, ज्यांचा या अतिक्रमणाशी काहीच संबंध नव्हता अशा लोकांनाही यामुळे त्रास झाला आहे. या सर्वप्रकारानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आहे, आणि त्यांनी हे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाचे २ मुख्य अधिकारी गडावर पोहोचले आहेत. आतापर्यंत त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमण केलेली २ अस्थापने काढली आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधी कुणी काहीच ॲक्शन घेत नसल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी यात लक्ष घालण्याचे ठरवले. त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी विशाळगडावर १४ जुलै रोजी आंदोलनाचा नारा दिला. त्यांच्यासोबत रवींद्र पडवळ यांनी सुद्धा आंदोलन पुकारले. पण, माजी खासदार संभाजीराजे गडावर पोहोचण्याआधी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. घडल्या प्रकारामुळे, गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात, गजापुरात हिंसाचाराचे जबरदस्त चटके बसले. घर, वाहनं आणि इतर मालमत्तेची खूप नासधूस करण्यात आली.
Sambhajiraje यांचा प्रशासनावर आरोप
विशाळगडावर घडल्या प्रकरणी शिवभक्तांवर कारवाई केल्या प्रकरणी संभाजीराजे (Sambhajiraje) म्हणाले, विशाळगडमध्ये पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा. यानंतर शाहूवाडी पोलीस स्थानकात जाऊन घडल्या प्रकाराबद्दल माजी खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांच्या केलेल्या कारवाई प्रकरणी चर्चा केली. तसेच या प्रकरणी संभाजीराजे यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोल्हापुरात घडलेल्या या प्रकरणी शिवभक्तांना अटक केल्यावर आणि संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता असताना. भाजप आमदार नितेश राणे यांनीही याप्रकरणी ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत म्हंटले की, विशाळगड मुक्ती साठी संघर्ष करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांबरोबर मी उभा आहे ! एक ऐतिहासिक कार्य तुम्ही करत आहात.. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.. ही काळजी आम्ही घेऊ !
Add Comment