Politics

Maharashtra Budget 2024: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस, शेतकरी, महिला आणि वारकऱ्यांसाठी खास तरतुदी

Maharashtra Budget 2024 जाहीर
अजित पवारांनी केला अर्थसंकल्प सादर
Maharashtra Budget 2024 च्या पेटाऱ्यात योजनांचा खजिना

राज्याचे पावसाळी अधिवेशन २७ जुलै रोजी सुरू झाले म्हणजे कालच सुरू झाले आणि आज २८ जुलै रोजी विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना महाराष्ट्राचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. विधानसभा निवणुकीपूर्वीचा राज्य सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात लोककल्याणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश केला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, आणि हाच अंदाज खरा ठरवत अजित पवारांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण योजनांचा समावेश केल्याचे दिसून येत आहे. एक नजर टाकुया महत्वाच्या काही योजनांवर…

पेट्रोल डिझेल होणार स्वस्त?

पेट्रोल डिझेल होणार स्वस्त?
Image Source: Lokmat Times

अंतरीम अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करत असताना अजित पवार म्हणाले की सामान्य नागरिक तसेच व्यावसायिक केंद्रांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा म्हणून मूल्यवर्धित करत समानता आणणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील कर २४ वरून २१ टक्के आणि पेट्रोलचा दर २६ वरून २५ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ज्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोल ६५ पैसे प्रति लिटर आणि डिझेल २ रुपये ७ पैसे प्रति लिटर इतके स्वस्त होईल.

महिलांसाठी अर्थसंकल्पात काही खास योजना

महिलांसाठी अर्थसंकल्पात काही खास योजना
Image Source: ABP Majha – ABP News
  • मध्यप्रदेश राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी ४६ हजार राखीव ठेवण्यात आले असून २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून या योजनेची अंमबजावणी केली जाईल.
  • अन्नपूर्णा योजनेमार्फत पात्र कुटुंबास ३ सिलेंडर दिले जाणार आहेत. आतापर्यंत ५२ लाख १६ हजार ४१२ इतक्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
  • राज्यातल्या १५ लाख महिला लखपती दीदी झाल्या असून यावर्षी २५ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
  • पिंक रिक्षा खरेदी करणाऱ्या महिलांना १७ शहरात १० हजार महिलांना निधी देण्यात येणार आहे. ज्यासाठी ८० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
  • नोंदणीकृत विवाह करणाऱ्या महिलांना १० हजार रुपयांऐवजी २५ हजार रुपये अनुदान मिळणार.
  • व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे म्हणून ८ लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असणाऱ्या ओबीसी आणि आर्थिक दुर्बल गटातील मुलींना १०० टक्के शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येईल. सुमारे २ लाख मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

शेतकऱ्यांसाठी नव्या योजना

शेतकऱ्यांसाठी नव्या योजना
Image Source: NDTV Marathi
  • खरीप हंगाम २०२३ करिता ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर. ई-पंचनामा प्रणाली राज्यात लागू.
  • गाव तिथे गोदाम योजनेअंतर्गत १०० गोदामांची निर्मिती होणार.
  • कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना खरीप पणन हंगामात २ हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी ५ हजार मिळणार.
  • गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान, १ जुलै २०२४ पासून योजना होणार लागू.
  • बांबू शेतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रती पीक १८५ रुपये लाभ मिळणार. नंदुरबार जिल्ह्यापासून होणार सुरुवात.
  • मोफत वीज मिळावी म्हणून ८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार सौरपंप

Maharashtra Budget 2024 मधील इतर महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget 2024 मधील इतर महत्त्वाच्या घोषणा
Image Source: ABP News
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना लवकरच सुरू करणार.
  • २१ लाखांहून अधिक घरांचे नळजोडणीचे काम प्रगतीपथावर.
  • पंढरपूरच्या वारीची जागतिक वारसा नामांकन म्हणून युनेस्कोसमोर प्रस्ताव मांडणार.
  • यावर्षापासून वारीतल्या पालख्यांना २० हजार रुपये निधी मिळणार.
  • वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत व्यक्तीला २० लाख रुपयांऐवजी २५ लाख मिळणार.
  • अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून १५ कोटींचे अर्थसहाय्य मंजूर.
  • १० युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला मिळणार दरमहा १० हजार रुपये विद्या वेतन.
  • बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योत, अमृत सारख्या योजनांमधून २ लाखांहून अधिक युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण.
  • रायगडात नवीन युनानी महाविद्यालय सुरू होणार.
  • सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू होणार.
  • संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत आता दीड हजार मिळणार.