Politics

Ajit Pawar यांनीही लागले मुख्यमंत्रीपदाचे वेध?

1363043 ajit pawar
Ajit Pawar यांची तुफान फटकेबाजी...

अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोकठोक बोलण्यामुळे चर्चेत असतात. एकेकाळी सोबत असणारे अजित पवार आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महायुतीतील एक महत्त्वाचा आणि प्रमुख पक्ष बनला आहे. पण, अजित पवार (Ajit Pawar) यांनी अलीकडे केलेल्या एका वक्तव्यामुळे दादांना सतत एक गोष्ट सतावत असल्याचे समोर येत आहे. आता ती गोष्ट कोणती घेऊया जाणून.

अजित पवार (Ajit Pawar) ठाण्यातील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते. या सोहळ्यात बोलत असताना चुकून की काय पण, अजितदादा आपल्या मनातील गूढ बोलून बसल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे त्याच्या तडपदार बाणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. हाच अनुभव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदें चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्यावेळी आला आहे. यावेळी त्यांनी एकीकडे आपल्या मनातील खदखद मांडली आहे तर, दुसरीकडे मी राजकारणात सिनियर आहे, पण माझे ज्युनियर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस माझ्यापुढे निघून गेले, ही बाबसुद्धा बोलून दाखवली.

Ajit Pawar यांचा महायुती सरकारलाच टोला…

Ajit Pawar यांचा महायुती सरकारलाच टोला…
Image Source: The Hans India

अजित पवार (Ajit Pawar) फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. तर,त्यांनी थेट भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या राजकीय कराराबद्दलही वक्तव्य केले आहे. काही आमदार आणले म्हणुन शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केले. पण,मला जर मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती. तर, मी तर अख्खी पार्टीच आणली असती, असे वक्तव्यात अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या फटकेबाजीनंतर आता शिंदेंप्रमाणे अजिदादांनाही (Ajit Pawar) संधी देण्यात यावी, अशी गळ राष्ट्रवादीचे आमदार भाजपला घालू पाहतायत.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी जेव्हा राष्ट्रवादी पक्ष सोडला होता, तेव्हा पहिल्याच भाषणात त्यांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याबद्दलची खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी हा मुद्दा उकरून काढलाय. त्यामुळे येत्या काळात राजकारणावर आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीवर याचा काय परिमाण होतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.