Politics

Ajit Pawar यांची सन्मान यात्रा तर, दुसरीकडे महायुतीची बैठक, काय शिजतंय राजकारण?

Ajit Pawar 3 2
Ajit Pawar करतायत विधानसभेची तयारी?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या प्रचाराचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील प्रत्येक पक्ष हा आपल्या पद्धतीने तयारीला लागला आहे. लोकसभा निवडणुकीत आश्चर्यजनक पद्धतीने इंडिया आघाडीने उत्तम कामगिरी केल्याचे दिसून आहे. मोठे मोठे दावे करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला राज्यात काही महत्त्वाच्या जागांवर पाणी सोडावे लागले. इतकेच नव्हे तर एनडीएचे काही स्टार उमेदवारसुद्धा विरोधकांसमोर हरले. यावेळी भाजपलाही राज्यात एकहाती सत्ता स्थापन करता आली नाहीये. सत्ता टिकवण्यासाठी त्यांना विरोधकांवर अवलंबून राहावे लागते आहे.

याचीच खबरदारी घेत महायुतीतील मुख्य पक्षांनी आतापासूनच प्रचार आणि प्रसाराच्या कामांना सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा, बैठका घ्ययला सुरुवात केली आहे. तर आता याचाच भाग म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात जन सन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) काढली आहे. ज्यात ते राज्यभर जनतेची भेट घेणार आहेत. यात्रेची सुरुवात नाशिक (Nashik) जिल्ह्यापासून करण्यात आली आहे. पण, काल अचानकच अजित पवार यात्रा मध्येच सोडून पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

Ajit Pawar घाईघाईत का निघाले मुंबईला?

Ajit Pawar घाईघाईत का निघाले मुंबईला?

उपमुख्यमंत्री काल रात्री तडकाफडकी जन सन्मान यात्रा स
(Jan Sanman Yatra) मध्येच सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मुंबईत आले. मुंबईत पोहोचताच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर पोहोचले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सुद्धा येथे पोहोचले. महायुतीतील तीन प्रमुख पक्षांचे नेते इतक्या तातडीने भेटल्यामुळे आणि अजित पवारसुध्दा (Ajit Pawar) जन सन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) मधेच सोडून मुंबईत दाखल झाल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आचारसंहितेपूर्वी विकासकामे पूर्णत्वाला नेणे, राज्यसभेचे जागा वाटप आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिकमधील दिंडोरी शहरातून जन सन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) सुरू केली.

तिथे त्यांचे महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांनी अगदी जंगी स्वागत केले. यावेळी अजित पवार लाडकी बहिण योजनेबद्द्लही बोलले. बोलताना ते म्हणाले की, ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे, आणि रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये हफ्ता जमा केला जाईल. तसेच ते पुढे म्हणाले की, मी कालच ६००० कोटी रुपयांच्या फाईलवर सही केली आहे.

वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बड्या नेत्यांनी बैठक झाल्याचा अंदाज लावला जातोय. ही बैठक काल रात्री ११ वाजता सुरू झाली. बैठक आटपल्यानंतर आता अजित पवार पुन्हा जन सन्मान यात्रेत सहभागी होणार आहेत.

About the author

Pradnya Mestri

Add Comment

Click here to post a comment