Table of Contents
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा लवकरच सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक आता जाहीर केले आहे. भारतीय संघ २६ जुलैपासून श्रीलंकेत टी-२० मालिका खेळणार आहे. हि टी-२० मालिका तीन सामन्यांची असणार आहे. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळवली जाणार आहे, आणि हि वनडे मालिका १ ऑगस्ट पासून खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने जरी वेळापत्रक जाहीर केले असले, तरी अजूनही या सामन्यांसाठी संघांची घोषणा दोन्हींपैकी एकाही बोर्डाने केली नाहीये.
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात २६ जुलैला पहिल्या टी-२० सामन्याने होणार आहे. हा सामना दुसऱ्या दिवशी अर्थातच २७ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता पल्लेकेले या ठिकाणी खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेतील शेवटचा सामना देखील २९ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा शेवटचा सामना देखील पल्लेकेले या ठिकाणीच खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेनंतर १ ऑगस्टपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १ ऑगस्टला खेळवला जाणार असून, दुसरा सामना ४ ऑगस्ट आणि तिसरा सामना ७ ऑगस्टला खेळवला जाणार आहे. सर्व एकदिवसीय सामने हे कोलंबोमध्ये खेळवले जाणार आहेत.
या दौऱ्यापासून गौतम गंभीर असणार संघाचे प्रशिक्षक – BCCI
भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) भारतीय क्रिकेट संघातील माजी दिग्ग्ज फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. गंभीर भारतीय संघाची जबाबदारी श्रीलंका दौऱ्यापासून स्वीकारणार आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाने टी-२० संघाच्या प्रशिक्षकाची घोषणा तर केली आहे. पण,अद्याप टी-२० संघाच्या कर्णधाराची घोषणा केली नाही. रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. मग आता संघाचा कर्णधार कोण? याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने काहीच स्पष्ट केले नाहीये. तसेच बीसीसीआयने अद्याप श्रीलंका दौऱ्यासाठी टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही.
Add Comment