News

Yashashri Shinde प्रकरणात मोठी अपडेट, दाऊदने सांगितले खुनाचे कारण…

maharashtra news 1
Yashashri Shinde आणि आरोपीची होती ओळख?

सध्या राज्यात खळबळ माजावणाऱ्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) उरण हत्येप्रकरणी एक नवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दाऊद शेख (Dawood Shaikh) या आरोपीला मुंबई न्यायालयाने आता ७ दिवसांची कोठडी सुनावली आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तपास करून चौथ्या दिवशी पोलिसांनी कर्नाटकातून दाऊद शेख (Dawood Shaikh) याला अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, आणि त्यानंतर आरोपीने (Yashashri Shinde) यशश्रीचा खून केल्याचे मान्य केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला ७ दिवसांची. कोठडी सुनावली आहे. दाऊद शेखच्या (Dawood Shaikh) सध्या ४ कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण महराष्ट्राला घाबरवणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांनी दाऊद याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. त्यानंतर पोलीस त्याला कर्नाटकातून नवी मुंबईत घेऊन आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्यानेच यशश्री हीचा खून केल्याचे समोर आले. लग्नाला नकार दिला म्हणून यशश्रीची हत्या केली असल्याचे त्याने कबूल केले. यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत दाऊदवर गुन्हे दाखल केले. त्याचप्रमाणे मृत यशश्री शिंदे हिला शिवीगाळ केल्यामुळे दाऊदवर पोलिसांनी ॲट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

यशश्री शिंदे हिच्या खुन्याला शिक्षा करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात होती. त्यानुसार आता ही केस फास्ट ट्रॅकवर चालवली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे सदर प्रकरण हाताळणार आहेत. तसेच आरोपीला अगदी कठोर शिक्षा देण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

खरंच होती का Yashashri आणि Dawood ची ओळख?

खरंच होती का Yashashri आणि Dawood ची ओळख?

गेल्या ३ ते ४ वर्षांपासून यशश्री शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते. यशश्री नवी मुंबईत ज्या ठिकाणी राहत होती, तिथेच दाऊदही राहत होता. त्या दोघांची एकमेकांशी चांगली मैत्री होती. पण, २०१९ साली यशश्रीच्या घरच्यांनी त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी पॉस्कोअंतर्गत दाऊदवर गुन्हा दाखल करण्यात आला. दाऊदला पोलिसांनी अटक केली, तो जेलमध्ये गेला, आणि जेलमधून सुटल्यावर तो तडक कर्नाटकात निघून गेला.

पण, त्यानंतरही यशश्री शिंदे आणि दाऊद शेख यांच्यात संपर्क सुरू होता. दोघेही एकमेकांशी फोनवर बोलत असत. दाऊदने उरणमध्ये आल्यावर यशश्रीशी पुन्हा संपर्क साधला. त्यानंतर त्यांचे भेटायचे ठरले. या भेटीत दाऊदने यशश्रीला लग्नाची मागणी घातली आणि कर्नाटकात जाऊन राहू असं सांगितलं. पण त्याला यशश्रीने साफ नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या दाऊदने तिची हत्या केली, आणि तिचा मृतदेह पेट्रोल पंपाच्या इथे फेकून दिला.