Table of Contents
काही दिवसांपूर्वीच सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांनी “जे गरजेचे असेल ते नक्की केले जाईल”, असेही म्हंटले होते. त्यांचे हे वक्तव्य राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत होते. माहविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात असल्यापासून महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अडकून पडला आहे. पण, सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांच्या कार्यकाळात आता काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईत बोलत असताना सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) म्हणाले की, मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे. जर शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव कदाचित राधाकृष्णन नसते. मला आपल्या संस्कृती व ऐतिहासिक वारशाचा गर्व आहे. मी शेतकरी, ओबीसी, एसटी एससी या प्रवर्गाच्या विकासासाठी काम करेन. मी राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करेन, राज्याच्या विकासासाठी काम करेन.
माहाविकास आघाडी सरकार असताना, भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राज्यपालांकडून १२ आमदार नियुक्त केले जातात. पण, याच १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून. महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात चांगलेच वाद जुंपले होते. भगतसिंह कोश्यारी भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करतात, त्यांनी घटनात्मक पदाचा गैरवापर केलाय, अशी टीका महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन, शिंदे सरकार आले तरी १२ आमदारांची नियुक्ती राज्यपालांनी केली नाही. राज्यात १२ आमदार विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडून नियुक्त केले जातात. सध्या राज्याची राजकीय परिस्थिती पाहता, या १२ आमदारांची नियुक्ती कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत C. P. Radhakrishnan?
सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) हे तामिळनाडूचे भाजप नेते आहेत. ते भाजपचे सदस्य फार जुने आहेत आणि पक्षात बराच काळ कार्यरत आहेत. त्यांनी वयाच्या 17.5 वर्षांपासून पक्षात काम केले आहे. सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. तसेच, 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांनी भाजपकडून लढल्या होत्या आणि त्या ते जिंकलेही. पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.
Add Comment