Table of Contents
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या कितीतरी दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच या मराठा आरक्षणामुळे घडत असलेल्या घटनांमुळे प्रश्न एक चर्चेचा विषय बनत चालला आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर, त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याविरोधात मनोज जरांगेंनी अनेक आंदोलने आणि उपोषणे देखील केली आहेत.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठकाही झाली होती. मात्र, या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही. तसेच राज्यसरकारनेही याबाबत काही निर्णय दिला नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि ओबीसी नेते आमने – सामने आले आहेत. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करणार’, असे विधान मनोज जरांगे यांनी केले आहे. तर यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंना आव्हान दिलं आहे. “तुम्ही २८८ उमेदवार निवडणुकीत उभेच करा आणि ८ जागा निवडून आणून दाखवा” असं प्रत्युत्तर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. छगन भुजबळ यांनी सांगलीतील ओबीसी मेळाव्यात बोलताना हे विधान केले आहे.
काय म्हणाले Chhagan Bhujbal?
“राज्यात महायुतीच सरकार आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाहीच. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही. मनोज जरांगेंना यांना सांगा की मराठा समाजाला ओबीसीमधून कदापी आरक्षण मिळणार नाही”, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
“मनोज जरांगे अनेकवेळा म्हणाले की, मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर आम्ही २८८ उमेदवार उभे करणार आहोत. आहो आधी ८८ उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारामधून फक्त ८ उमेदवारच निवडून आणा. निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा. माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभेच करुन दाखवा”, असं खुलं आव्हान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे यांना दिलं.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणासंबंधी काही निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Add Comment