Table of Contents
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक सुरु होणार आहे, आणि अशातच आता सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३९ आमदारांसह महाविकास आघाडी मधून बाहेर पडले, आणि त्यानंतर राज्यात सत्तापालट झाली. याच पद्धतीने अजित पवार हे सुद्धा ४१ आमदारांसह शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले. त्यानंतर शिंदे गटाचे ३९ आमदार अपात्र ठरवावेत म्हणून ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी तर, अजित पवार गटाचे ४१ आमदार अपात्र ठरवावेत म्हणून शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली.
अजित गटाकडून सुनावणीपूर्वी याचिकेवर उत्तर मागवले होते. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाने अजित पवार गटाने तीन आठवड्याचं अवधी मागितला आहे. जो त्यांना सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दुसरीकडे शिंदेगट आमदार अपात्रता प्रकरणी बोलताना कोर्टाने म्हंटले आहे कि, शिवसेनेची कागदपत्रे बरोबर आहेत, पुढच्या सुनावणीच्यावेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकू आणि त्यासाठी लवकरचं आम्ही तारीख देऊ.
काय म्हणाले CJI Chandrachud?
एकीकडे जिथे विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रता प्रकारचा निकाल लागेल,अशी शक्यता एकीकडे वर्तवली जात असतानाच, सुनावणी दरम्यान सीजेआई चंद्रचूड ठाकरे गटाच्या एका वकिलावर चांगलेच भडकल्याची माहिती आता समोर येत आहे. ठाकरे गटासंबंधित निर्णय देण्यात सुप्रीम कोर्ट खूप दिरंगाई करत आहे, आणि यासाठी तुम्ही लवकरात लवकर तारीख द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलाकडून केली जात होती.
त्यांच्या या मागणीवर चिडत, “सीजेआई चंद्रचूड म्हणाले कि, न्यायालयाला तुम्ही सूचना देऊ नका. तुम्ही इथे आमच्या जागेवर का बसून पाहत नाही आणि तुम्हीच का सांगत नाही न्यायाधीशांना कि तुम्हाला कोणती तारीख हवीय? तुम्ही पाहू शकता कोर्टवर कामाचा ताण आहे. तुम्ही खरंच इथे आमच्या जागेवर बसून पाहा….. संपूर्ण दिवस बसा. मी तुम्हाला आश्वासन देतो की, तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी पळाल.”
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे विरुद्ध शिंदे या केसचा निकाल लागण्याची शक्यता वकील वर्तवत आहेत. पण, जर हा निकाल खरंच लागला तर याचा ठाकरे किंवा शिंदे यापैकी कुणाला फायदा होतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Add Comment