Table of Contents
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा करत आहेत. याच दरम्यान त्यांनी धाराशिव येथे आरक्षणाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यानंतर त्यांना याबाबत जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकांचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी ते थांबलेल्या हॉटेलमध्ये गेले होते. पण, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांना भेटण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे आता मराठा अंदोलकांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. तसेच राज ठाकरे यांना भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असा इशारा पण त्यांनी दिला आहे.
मराठा आंदोलकांची ही आक्रमक भूमिका पाहता, राज ठाकरे यांनी दोन आंदोलकांना भेटण्यास परवानगी दिली. पण, कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हते. राज ठाकरे म्हणाले की, “माझ्याशी बोलायचं आहे ना? मग वरती या. या घोषणा आधी बंद करा. त्यानंतर राज ठाकरे अरेरावीची भाषा करतात असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
Raj Thackeray यांनी अरेरावीची भाषा केली.
मराठा आंदोलकांनी माध्यमांना संवाद साधताना म्हटले की, “राज ठाकरे आमच्याशी रुबाबात बोलले, हुकूमशाही पद्धतीने बोलले. तुम्ही शांत बसा, घोषणा बंद करा, बोलायचं असेल तर दोघं जण या. मी त्यांना बोललो, आलो तर आम्ही सर्व येणार. पण ते नाही म्हणाले. राज ठाकरे यांनी अरेरावीची भाषा केली. आता उद्या राज ठाकरे उद्या कशी प्रेस कॉन्फरन्स घेतात ते बघतो. इथे धराशिवमध्ये दादागिरीची भाषा चालणार नाही”, अशा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
“राज ठाकरे म्हणाले, घोषणा बंद करा. याचा अर्थ काय? आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर असताना त्यांनी घोषणा बंद करा म्हटलं”, असं दुसऱ्या आंदोलकाचे म्हणणे आहे. तर तिसऱ्या आंदोलकाने म्हटले की, राज ठाकरे यांना बाहेर निघू देणार नाही. जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना हॉटेलमधूनल निघू देणार नाही”. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत हॉटेलबाहेर ठिय्या मांडला. या प्रकरणी पोलीस मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्याचा फारसा काही फरक पडेल असं वाटतं नाही.
Add Comment