Table of Contents
आजचा दिवस वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. आज पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या काठी आषाढी एकादशीचा सोहळा रंगला आहे. आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण आहे. संपूर्ण पंढरपूर आज विठ्ठलमय झाले असतानाचा, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.
आज पहाटे मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईची (Viththal Rakhumai) शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर पंढरपुरात एका सभेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) राज्यात लवकरच लाडका भाऊ योजना लागू होणार असल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर (Mazi Ladaki Bahin Yojana)आता राज्यात ‘लाडका भाऊ’ (Ladka Bhau) योजना लागू करण्यात आली आहे. या नव्या योजनेअंतर्गत १२वी पास तरुणांसाठी दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी दरमहा ८ हजार रुपये, आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी १० हजार रुपये दरमहा स्टायपेंड म्हणून देण्यात येणार आहेत.
अर्थसंकल्पात जेव्हा माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती तेव्हा लाडक्या भावांसाठीही काही योजना सुरू करा किंवा मग भावांसाठी काही योजना नाहीत का? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ या योजनेच्या माध्यमातून योग्य ते उत्तर दिले आहे.
Ladka Bhau योजनेसाठी पात्रता काय ?
- लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- तसेच अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचं आहे.
- अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किमान १२वी पास, डिप्लोमा धारक, किंवा पदवीधर इतकी असणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुण पात्र असतील.
- त्याचप्रमाणे अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे
योजनेसाठी अर्ज कसा कराल?
- महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- न्यू युजर रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर एक अर्ज दिसेल, त्या अर्जावर क्लिक करून तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट ही माहिती भरा.
- त्यानंतर अर्ज पूर्ण करण्यासाठी इतर आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्र अपलोड करा.
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
Add Comment