Table of Contents
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. अशातच राज्यातील सर्वच पक्ष या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राज्यातील नेत्यांनी राजकीय दौऱ्यांची सुरुवात केली आहे. ज्यात ते राजकीय पक्षांच्या बैठका, उमेदवारांचे आढावे, सभा, मेळावे आणि मतदारांची चाचपणी अशी कामे उरकत आहेत. या दौऱ्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांच्या आमने सामने आल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे. या सगळ्यात निवडणुकीच्या काही महिने आधी सत्ताधारी पक्षाने लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली आणि विरोधकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली.
राज्यात लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही महिलांच्या हितासाठी जाहीर करण्यात आली होती. ज्यात दरमहा महिलांना १५०० रुपये मिळणार असल्याचे जाहीर केले गेले आहे. पण, या योजनेची घोषणा होताच, विरोधकांनी लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) आधारे सत्ताधारी पक्षावर निशाणा साधायला सुरुवात केली. इतकाच नव्हे तर, ही योजना म्हणजे फक्त निवडणुकीत वाटली जाणारी रेवडी असल्याचेही म्हटले आहे. पण, आता याच योजनेला विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) एका सभेदरम्यान दिले आहे. ‘लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा’, असे त्यांनी म्हटले आहे.
Ladki Bahin Yojana बद्दल काय म्हणाले नेते?
“काही सावत्र भाऊ तुम्हाला पैसे मुळू नये, म्हणून प्रयत्न करत आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये (Ladki Bahin Yojana) खोडा घालण्याचं काम ते करत आहेत. पण त्यांना जोडा दाखवा. विरोधी पक्षातील काहीजण लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयातही गेले होते. मात्र, न्यायालयानेही त्यांना चपराख दिली. विरोधकांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. आता लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना या योजनेचे पैसे देण्यास सुरुवात देखील झाली आहे. महाराष्ट्रातील आमच्या बहिणी हुशार आहेत. त्यांना देणारे कोण आणि घेणारे कोण? हे माहिती आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) सरकारवर टीका केली. अमोल कोल्हे म्हणाले, “४० पैशांचे काही लावारीस भक्त सोशल मीडियावर तीन हजार रुपये आले म्हणून पोस्ट शेअर करत आहेत. आता तुम्हाला एक गंमत पाहायची असेल तर लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) पोर्टलवर एकूण ३२ लाख अर्जांची संख्या आहे. पण पोर्टलवर मंजूर असलेल्या अर्जाची संख्या फक्त १९ आहे. तरीही काही भक्त सोशल मीडियावर सांगत आहेत पैसे आले. कारण ही फक्त लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) नाही तर लाडकी पडदा योजना आहे”, अशी खोचक टीका अमोल कोल्हे यांनी केली.
Add Comment