Agriculture

शेतकरी झाला विकासक, पण, Panvel ची भातशेती घटली

pnvl
Panvel मधील भातशेती घटली...

पनवेल हा अलीकडच्या काळात मोठ्या वेगाने विकसित होणारा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. सध्या पनवेलमधील (Panvel) गावांचे शहरात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पनवेलमधील सहा एकर भातशेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरावरचा ताण कमी करण्यासाठी आधी नवी मुंबई आणि आता पनवेल (Panvel) शहर विकसित केले जात आहे. निवासी व औद्योगिक वापरासाठी पालिका हद्दीतील शेतकऱ्यांना जरी विकासक होण्याची संधी मिळाली असली, तरी त्यांना पारंपारिक शेतीवर पाणी सोडावे लागत आहे.

शेतकऱ्यांना पालिकेने प्रारूप आराखड्याबाबत हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. पनवेल तालुक्यात पूर्वी १५ हजार हेक्टर क्षेत्रात शेती केली जात होती. तर, आता सहा हजार क्षेत्रांवर भातशेती केली जातेय. पनवेल महापालिकेने (Panvel) वाढत्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन एक आराखडा तयार केला आहे. ज्यात १२ हजार शेतजमिनीचा समावेश आहे. ७० टक्के जमिनींवर निवासी क्षेत्राचे आरक्षण करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आराखड्याचा १८ गावांवर थेट. परिणाम होईल. १२ हजार हेक्टर जमिनींचा विकास होणार आहे. त्यामुळे या जमिनींच्या राखणदार शेतकऱ्यांना आता स्वतःचे राहणीमान उभारण्याची संधी मिळणार आहे. पण, कुठेतरी या सगळ्यामुळे शेतकरी पारंपरिक भातशेतीपासून दुरावले जाणार आहेत.

Panvel चा होणार विकास की विनाश?

Panvel चा होणार विकास की विनाश?
Image Source: Homes247.in

१५००० चौरस किलोमीटर इतके पनवेलचे (Panvel) एकूण क्षेत्रफळ आहे. त्यापैकी ११० चौरस किलोमीटर इतके पनवेल महानगरपालीकेचे क्षेत्रफळ आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात (नैना) अंतर्गत पनवेलमध्ये ४५ चौरस किलमीटरच्या भागात आठ हजार कोटी रुपयांची रस्ते व पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू होणार आहेत.

यंदा फक्त ६ हजार शेतकऱ्यांनी भातशेतीचे पीक घेतल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शरद गीते यांनी दिली. पनवेल पालिका (Panvel) क्षेत्रातील ६० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि नगररचनाकार विभागाच्या प्रमुख ज्योती कवाडे यांनी दोन दिवसांपूर्वी भविष्यातील २० वर्षे कोणत्या प्रकारे विकास केला जाईल याचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला. यामध्ये पनवेल तालुक्यातील उत्तरेकडील गावांचा समावेश मोठ्या संख्येने आहे. या परिसरातील १५ गावांमधील शेतजमिनींवर निवासी क्षेत्र जाहीर करून शेतकऱ्यांना विकासाची संधी पालिकेने दिली.

पनवेल (Panvel) मधील बीड, आडिवली, रोहिंजण, धानसर, धरणकॅम्प, धरणगाव, पिसार्वे, तुर्भे, नागझरी, तळोजा मजकूर, घोट, कोयनावेळे, करवले बुद्रुक या गावांसह पूर्वेकडील काळुंद्रे, देवीचापाडा, पाले खुर्द, पडघे, वळवली या गावांचा समावेश आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीवर इमारत बांधकाम करून विकासक होता येईल. तसेच या क्षेत्रात बांधलेल्या इमारतींमधील सदनिका विक्री करता येईल. यामुळे, सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन आता शेतकरी विकासक होतील.

About the author

Pradnya Mestri

Add Comment

Click here to post a comment