Table of Contents
सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेलं राजकारण काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. एकीकडे महायुतीत लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरु आहे. तर, दुसरीकडे विरोधक रोज नव्याने या योजनेचा विरोध करताना दिसत आहेत. अशातच आता निवडणूक आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
एक विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या कार्यक्रमाला गुलाबी जॅकेट घालून पोहोचले होते. यावेळी महिलांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी संवाद साधला. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी मालवणी भाषेत संवाद साधणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महीलांपैकी एका महिलेने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना लाडकी बहिण योजना कधी बंद होणार? असा प्रश्न विचारला. त्यावर आमचं सरकार आहे, तोवर ही योजना सुरू राहणार असे उत्तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले.
भाजपच्या या कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर, अमित साटम, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि इतर नेते उपस्थित होते.
काय म्हणाले Devendra Fadanvis?
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”आज तुम्ही दिलेल्या प्रेमातून उतराई व्हायक नाही. आत बसलेल्या महिलांइतक्याच महिला बाहेर आहेत. ज्यांना इथं हॉलमध्ये जागा मिळाली नाही त्यांना आमच्या हृदयात जागा आहे. माझ्या भगिनी जेव्हा मला देवाभाऊ म्हणतात मला ते सर्वाधिक आवडतं. 2027 पासून होणाऱ्या निवडणुकीत महिलांची संख्या वाढणार आहे. मोदींनी देश चालवण्याची जबाबदारी महिलांवर दिली. एसटीसाठी महिलांना सूट दिली. महिलांचा चमत्कार बघा, तोट्यात गेलेली एसटी फायद्यात आली. काही नेत्यांनी योजनेबाबत प्रश्न केले. सावत्र भाऊ तुम्हाला काहीही देणार नाहीत”.
“पुन्हा आपलं सरकार येणार आहे, पुन्हा आपण यासाठी तरतूद करु. बहिणींनो चिंता करू नका, जोवर महायुती सरकार आहे तोवर योजना बंद करू शकत नाहीत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना 1500 रुपयांची काय किंमत कळणार. लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हे विरोधकांचं ब्रीदवाक्य आहे.”
“आम्ही बोल बच्चन नाही. काही बोलबच्चन आहेत, केवळ भाषण करतात. हे लेना बँकवाले, यांची तोंडं रावणासारखी आहेत. दहा तोंडाने खोटं बोलणारी आहेत. महिलांविषयी बोलणाऱ्या नादान लोकांना सांगतोय महिला मुली आणि आईचं प्रेम कुणीही खरेदी करू शकत नाही.”
Add Comment