Politics

Devendra Fadanvis यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

interview 30474342
Devendra Fadanvis यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

विरोधकांनी महायुती सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पातील अनेक घोषणांवर आतापर्यंत आक्षेप घेतना आहे. पण, नागपुरात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांच्या सर्वच प्रश्नांना प्रत्युत्तर दिले आहे.

“लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) आपली मतं वाढणार आहेत. पुढच्या मार्च पर्यंतचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बजेटमध्ये ठेवले आहेत. काही लोक लाडकी बहीण विरोधात हायकोर्टात गेले होते. मात्र कोर्टाने त्यांची विनंती स्वीकारली नाही. ज्यांचे फार्म अपडेट झाले नाही त्यांनीही काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे पुढच्या महिन्यात अपडेट झाले तरी पैसे मिळतील”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, आपण लेक लाडकी योजना आणली तिला 1 लाख मिळणार आहेत. महाविकास आघाडी वाले रोज सांगतात गॅसचे भाव वाढले. आम्ही वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार आहोत. मुलींच शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून अॅपरेंटीस योजना आणली त्यात 10 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

Devendra Fadanvis यांचा विरोधकांना टोला

Devendra Fadanvis यांचा विरोधकांना टोला
Image Source: India Today

शेतकऱ्यांना केंद्र सोबत आपले 6 हजार दिले 1 रुपयात विमा उतरविला देशात रेकॉर्ड आहे. कापूस सोयाबीनचे भाव कमी झाले,त्याच्यासाठी आपण निर्णय घेतला होता. मात्र आचारसंहिता लागली आता ती मदत आपण करणार आहोत. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला. आपले निर्णय यांच्या सारखे नाहीत. निवडणूक झाली की बंद केले. सोलरच्या माध्यमातून वीज दिली जाणार आहे. वीजचे काही दर वाढले होते त्यातून सोलरची व्यवस्था केली. पवार साहेब विचारतात या योजनांसाठी पैसे कुठून आणणार त्यांनी आधी राहुल गांधी यांना विचारावं ते खटाखात कुठून देणार होते, असा सवालही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. नागपूर जिल्ह्यात विकास गंगा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणली. नळ गंगा योजना आम्ही आणली त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल. माझ्या विदर्भाच मी देणं लागत म्हणून मी सगळ्या योजना आणतो. मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपण विदर्भात आणल्या. आपला प्रॉब्लेम झाला तो म्हणजे 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली त्यामुळे एक निवडणूक हरली तरी ते खचतात,निराश होतात बोअर पसरवतात त्यांनी हे सोडावं. आता मी तीन महिन्यात आपलं सरकार आणतो, असा दावासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.