Politics

तर मी त्याचवेळी राजीनामा देईन, असं का म्हणाले Devendra Fadanvis?

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil
Devendra Fadanvis घेणार राजकारणातून संन्यास?

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण हा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच त्यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणारे मनोज जारांगे हे दरवेळेस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधताना दिसून येत आहेत. “एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी थांबवत आहेत”, असा आरोप जरांगेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर केला आहे. पण आता यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले Devendra Fadanvis?

काय म्हणाले Devendra Fadanvis?
Image Source: Marathi News

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले. माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी केले आणि शिंदेंच्या पाठीशी मी भक्कमपण उभा राहिलो आहे. त्यामुळे अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा सांगतो जर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी तो निर्णय होऊ दिला नाही, त्याचक्षणी मी राजीनामा देईन. तसेच राजकारणातून संन्यासही घेईन.

मला कल्पना आहे की, मनोज जरांगे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र हे देखील सांगितलं पाहिजे की राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. मी त्याही पुढे जाऊन सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन, असे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राचे राजकारण काय वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.