महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यात माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली. सरकारच्या सांगण्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे पण जमा झाले. परंतु, अजूनही विरोधकांकडून अजूनही या योजनेवर टीका केली जात आहे. त्याप्रकरणी बोलत असताना आता रत्नागिरीतील एका कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, ” विरोधकांनाही वाटलं होतं की पंधराशे रुपयांची घोषणा केली पण पैसे जमा होणार नाहीत परंतु पैसे जसे खात्यात जमा होत गेले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले. ‘बुरी नजर वाले तेरा मुह काला’ अशा प्रकारची विरोधकांची अवस्था झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार आम्ही चर्चा करून हा निर्णय घेतला. परिस्थिती बदलत जाईल तशी यामध्ये पंधराशे रुपये नाहीतर दोन हजार, अडीच हजार , तीन हजार, याहीपेक्षा देण्याची दानत तुमच्या या सगळ्या भावांमध्ये आहे”.
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्याचे दोन हप्ते रक्षाबंधनापूर्वी बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकले नसतील त्यांनीही ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरल्यास जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीनही महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असून कोणी माईचा लाल आला तरीही ही योजना बंद करू शकणार नाही असं शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.
बदलापूर प्रकरणी Eknath Shinde ची प्रतिक्रिया..
”बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना हि अतिशय निंदनीय असून त्या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. अशा प्रकरणात सरकार गंभीर असून आरोपीला फाशी व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. या घटनेतील आरोपीला अटक केली असून संस्था चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. तसेच दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार आहे”. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हंटलं आहे.
ते पुढे म्हणाले की, ”बदलापूरात झालेले आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होते. बाहेरून लोकं आणून नऊ तास रेल रोको करण्यात आला. अशा घटनेचे राजकारण करणे गैर होते मात्र विरोधकांना त्याचा विसर पडला. या योजनेची लोकप्रियता वाढल्याने त्याबद्दलचे बोर्ड या आंदोलनात नाचवण्यात आले. शासन महिलांना सुरक्षा देण्यासाठी सक्षम असून महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल” असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
Add Comment