Table of Contents
सध्या माणूस आणि मोबाईल फोनचे कनेक्शन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पूर्वी फक्त एकमेकांशी संवाद साधायला वापरला जाणारा मोबाईल जणू माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. मोबाईल (Mobile) हा स्मार्टफोन झाल्यापासून त्याचा वापर फक्त एकमेकांशी संवाद साधण्यापूर्ता राहिलेला नाही.
आता मोबाईल (Mobile) हा दैनंदीन जीवनात ऑनलाईन कामं, मनोरंजन, पेमेंट करणं या आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी वापरला जातो. पण, तुम्हाला माहिती आहे का की जर याच बहुपयोगी मोबाईलची नीट काळजी नाही घेतली तर ते तुम्हाला फार महागात पडू शकते. मोबाईल जिवंत राहण्यासाठी त्याची बॅटरी निरोगी असणं गरजेचं आहे. बॅटरी खूप काळ टिकावी यासाठी मोबाईल चार्गिंजचा “४०-८० चार्जिंग रूल” पाळणे खूप गरजेचे आहे.
मोबाईलला ४० टक्क्यांपेक्षा कमी चार्जिंग न ठेवणे आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त न ठेवणे हा या नियमाचा अर्थ आहे. तज्ज्ञांच्या मते मोबाईल चार्जींगचा ४०-८० चा नियम पाळणे हा बॅटरी दीर्घकाळ टिकविण्याचा उत्तम मार्ग आहे. हा नियम सांगतो की, मोबाईलची चार्जिंग कधी ४० टक्क्यांपेक्षा कमी होऊ न देणे आणि मोबाईल पूर्ण चार्ज न करता तो ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करणे.
Mobile बॅटरी लवकर का खराब होते?
बहुतांश मोबाईलमध्ये (Mobile) हल्ली लिथियम-आयन बॅटरी वापरली जाते. या बॅटरीची ‘डिस्चार्ज-चार्ज सायकल’ ची संख्या मर्यादित असते. जेव्हा आपण आपला मोबाईल शून्य टक्के ते १०० टक्के असा चार्ज करतो तेव्हा फोनच्या बॅटरीची एक डिस्चार्ज-चार्ज सायकल पूर्ण होते. त्यामुळे आपण जितके जास्त डिस्चार्ज-चार्ज सायकल पूर्ण करतो, तितकी मोबाईलची बॅटरी खराब होत जाते. पण जर याऐवजी आपण ४०-८० चार्जिंग रूलचं नियमित पालन केलं तर आपण जास्त काल मोबाईलची (Mobile) बॅटरी वापरू शकतो.
Apple discussion वर बॅटरी लाईफबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनीही उत्तर देताना फोन ८०% पर्यंत चार्ज ठेवावा, असा सल्ला दिला आहे. सतत मोबाईल चार्जिंगला लावल्यामुळे मोबाईलची (Mobile) बॅटरी लाईफ पटपट ढासळते. तसेच त्यांच्यामते मोबाईलची चार्जिंग २० टक्के झाली की मोबाईल फोन चार्ज केला पाहिजे. तसेच अलीकडच्या मोबाईलमध्ये (Mobile) १०० टक्के चार्जिंग झाली की मोबाईल आपोआप चार्जिंग घेणं बंद करतो. पण, कुठेतरी मोबाईलचे हेच फीचर जर बंद पडले तर, अनेकदा मोबाईल फुटण्याची पण भीती असते. त्यामुळे कोणत्याही बॅटरी खराब होऊन एखादी वाईट घटना घडण्याआधी आपणच खबरदारी घेतलेली काय वाईट? त्यामुळे तुम्हीही हा नियम पाळा आणि तुमच्या मोबाईलची बॅटरी लाईफ वाढवा.
Add Comment