Table of Contents
तुमचंही कोणतं सरकारी काम करायचं तुम्ही बाकी ठेवलंय का? तसं असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण, येत्या काही दिवसात महाराष्ट्रभरातील सरकारी कर्मचारी (Goverment Employee) संपावर जाणार आहेत. थोडे थोडके नाहीतर तब्बल १७ लाख कर्मचारी संप पुकरणार आहेत. तसेच हा संप बेमुदत असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या सरकारी कर्मचारी (Goverment Employee) संघटनांच्या कृती समितीची मुंबईत बैठक पार पडली.
या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांनी (Goverment Employee) एकमताने आक्रमक पवित्रा घेत, येत्या २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कमोर्तब केला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. जुन्या पेन्शन योजनेस इतर योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना (Goverment Employee) लवकरात लवकर मिळावा म्हणून हा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृती समितीचे प्रतिनिधी विश्वास काटकर यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. तसेच, या मागण्यांची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने (Goverment Employee) तात्काळ नोटिफिकेशन जारी करावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. जोवर सरकार नोटिफिकेशन जारी करणार नाही तोवर संप सुरूच राहील, असे देखील कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
Goverment Employee च्या मागण्यांबद्दल काय म्हणाले विश्वास काटकर?
“महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जातील, असा निर्णय आज मुंबई येथील समन्वय समितीच्या विस्तारीत सभेत झाला. राज्य सरकारने पेन्शनबाबत जे आश्वासन दिलं ते अद्याप पाळण्यात आलेलं नाही. सामाजिक आणि आर्थिक सुलक्षण म्हणून जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन मिळेल, असं आश्वस्त करुन सुद्धा त्या संदर्भातील नोटीफिकेशन निघू शकलेलं नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी, शिक्षक हे चिंतेत आहेत”, असं विश्वास काटकर म्हणाले.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुक सुरू होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकार नवे निर्णय किती वेळात निर्णय घेते? याबाबत साशंकताच आहे. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची (Goverment Employee) सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे आता २९ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वास काटकर यांनी दिली आहे.
एखादं सरकारी काम पूर्ण व्हायचं म्हटलं की आधीच वेळ लागतो. त्यामुळे आता जर तब्बल १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले. तर, सामान्य नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Add Comment