Table of Contents
मुंबईत मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने दहीहंडी (Dahihandi 2024) साजरी केली. थरावर थर लावून अनेक गोविंदांनी मानाच्या हंड्या फोडल्या. पण, याच हंड्या (Dahihandi 2024) फोडताना काही पथकांचे गोविंदासुद्धा खूप जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. एकट्या मुंबईत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 63 गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली. यापैकी 8 गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 32 जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. तर, 23 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही दहीहंडी (Dahihandi 2024) फोडताना अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पण, कोणालाही गंभीर दुखापत न झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस नेमका दहीहंडीच्या (Dahihandi 2024) दिवशी कोसळू लागला. चाळीतील गल्लीपासून ते राजकीय पक्षांच्या हंड्या फोडण्यासाठी जणू गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी 8 तर काही ठिकाणी 9थर रचण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. जय जवान गोविंदा पथकाने 10 थर लावण्याचा प्रयत्न केला. पण, ते अपयशी ठरले.
Dahihandi 2024: कोणत्या रुग्णालयात आहेत उपचार सुरू?
- केईएम रुग्णालय : 8 गोविंदा
- लोकमान्य टिळक, सायन रुग्णालय : 7 गोविंदा
- नायर रुग्णालय: 5 गोविंदा
- जे जे रुग्णालय : 1 गोविंदा
- सेंट जॉर्ज रुग्णालय : 3 गोविंदा
- जीटी रुग्णालय : 1 गोविंदा
- पोद्दार हॉस्पिटल : 6 गोविंदा
- लिलावती रुग्णालय: 1 गोविंदा
- राजावाडी रुग्णालय : 3 गोविंदा
- एमटी अग्रवाल हॉस्पिटल : 1 गोविंदा
- वीर सावरकर रुग्णालय : 1 गोविंदा
- शतब्दी रुग्णालय : 6 गोविंदा
- वांद्रे भाभा रुग्णालय : 3 गोविंदा
- व्ही एन देसाई रुग्णालय : 4 गोविंदा
- कूपर हॉस्पिटल : 6 गोविंदा
- भगवती रुग्णालय- 0
- ट्रॉमा केअर हॉस्पिटल- 4 गोविंदा
- BDBA रुग्णालय- 9 गोविंदा
- एस के पाटील रुग्णालय- 0
- नानावटी रुग्णालय- 0
ठाणे भागात दहीहंडी फोडताना 8 गोविंदा जखमी झाले. पण, त्यातील काही जणांवर सध्या उपचार सुरू असून ते गंभीर जखमी नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
Add Comment