Entertainment

अभिनेत्री Hina Khan अडकली Breast Cancer च्या विळख्यात, सोशल मीडियावरून दिली चाहत्यांना माहिती

Hina Khan ला झाला ब्रेस्ट कॅन्सर
३६ वर्षीय हिना खानला झाला ब्रेस्ट कॅन्सर
Hina Khan ला झालेला Breast Cancer स्टेज-३ म्हणजे काय?

ये रिश्ता क्या कहलाता हैं (Yeh Rishta Kya Kehlata hai) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि बिग बॉस (Bigg Boss), खतरों के खिलाडी (Khataron Ke Khiladi) अशा रिॲलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे हिना खान (Hina Khan). हिना ही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव असते आणि तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. पण, तिने अलीकडेच केलेल्या एका पोस्टमध्ये चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कारण, तिने त्या पोस्टमध्ये स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) झाल्याचे सांगितले आहे.

पोस्टमध्ये करत काय म्हणाली Hina Khan

पोस्टमध्ये करत काय म्हणाली Hina Khan
Image Source: The Narinder

चाहत्यांसोबत हिना खानने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, सर्वांना नमस्कार! मला काही अफवांबद्दल बोलायचं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या माझ्या चाहत्यांसोबात मला एक गोष्ट शेअर करायची आहे. मला स्टेज ३ स्तनाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. मी या आजाराशी लढत आहे. माझे उपचार सुरू आहेत. मी खंबीरपणे या आजाराची लढण्यासाठी तयार आहे. या कठीण काळात माझ्या प्रायव्हसीचा तुम्ही आदर कराल अशी आशा करते. हिनाच्या या पोस्टनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण, तिने ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी देखील तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.


नक्की काय आहे Stage-3 Breast Cancer?

नक्की काय आहे Stage-3 Breast Cancer?
Image Source: Marathi News

जेव्हा स्तनाच्या टिशुंमध्ये अनियंत्रित पेशींची वाढ होते, तेव्हा स्तनाचा कॅन्सर होतो. जागतिक स्तरावर जरी स्त्रियांमध्ये स्तानाच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण जरी जास्त असेल तरी तो पुरुषांना देखील होऊ शकतो. स्टेज-३ स्तनाच्या कॅन्सरमध्ये ट्युमर हा लिंबाच्या आकारा एवढा असतो. म्हणजेच तो ५ सेमी इतका असतो. जो एक ते तीन लिम्प नोड्समध्ये दिसून येतो आणि या लिम्प नोड्स मान आणि स्तनाच्या भागात असतात.

अशा परिस्थितीत स्तन दुखणे, स्तानातून पांढऱ्या पिवळ्या,हिरव्या किंवा लाल रंगाचे स्त्राव बाहेर पडणे, स्तन आणि त्वचेत बदल होणे अशी लक्षणे दिसून येतात. स्टेज-३ कॅन्सर हा 3A, 3B आणि 3C या श्रेणींमध्ये विभागला असून, वय अनुवंशिकता आणि जीवनशैली या घटकांमुळे स्तन कॅन्सरचा धोका बळावू शकतो. स्तनाचा कॅन्सर टाळण्यासाठी ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी नियमित तपासणी करून घेणे आणि काही आढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.