Table of Contents
सध्या सर्वत्र माझी लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) ही चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील महिलांना आणि मुलींना सक्षम आणि स्वावलंबी बनवता यावे, आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून ही योजना लागू करण्यात आली. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाखो महिलांनी माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला आहे. तसेच योजनेच्या माध्यमांतून दरमहा महिलांना १५०० रुपये देण्यात येतील असे शासनाने सांगितले आहे.
विशेष म्हणजे रक्षाबंधन या सणा आधीच लाडक्या बहिणींना (Mazi Ladki Bahin Yojana) शासनाने योजनेचे पैसे देत खुश केले आहे. त्यामुळे महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. १ जुलै २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली तर, ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. पण, माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या, आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेल्या लाभार्थींनाच योजनेचे पैसे मिळणार आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana लाभार्थी यादी तपासण्याच्या पायऱ्या:
माझी लाडकी बहिण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) तुम्ही अर्ज केला असेल, पण त्याची लाभार्थी यादीही तुम्हाला आता तपासता येणार आहे, आणि तेही ऑनलाईन. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलाय त्या अर्जाचा स्टेटस तपासू शकतात. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मोबाईल किंवा इतर साधनांवर शासनाचे अधिकृत ॲप डाऊनलोड करण्याची गरज आहे. लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- माझी लाडकी बहिण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून ‘नारी शक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करा.
- त्यानंतर या ॲपमध्ये आवश्यक ती माहिती भरा.
- त्यानंतर तुम्हाला होमपेजवर माझी लाडकी बहिण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा आणि त्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय दिसेल.
- त्या यादीवर क्लिक करून तुम्ही यादीमध्ये तुमचे नाव समविष्ट आहे की नाही हे तपासू शकता.
- जर या लाभार्थी यादीत तुम्हाला तुमचे नाव आढळले तर, तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला आहात आणि लवकरच तुम्हाला याचे पैसे मिळतील. पण, जर या यादीत तुमचे नाव नसेल तर, तुम्ही योजनेसाठी पात्र नाही आहात.
Add Comment