Mazi Ladki Bahin Yojana साठी तुम्ही केला का अर्ज
Table of Contents
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. त्यानंतर काही ऑफलाईन तर काहींनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत दीड कोटींहून अधिक महिलांनी माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला आहे. असं असलं तरी अजूनही अनेक महिलांनी या योजनेसाठीचा फॉर्म भरलेला नाही. पण, अजूनही वेळ गेलेली नाही. ३१ ऑगस्टपर्यंत महिला माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरू शकतात. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत:
अधिकृत संकेस्थळावरून असा भरा Mazi Ladki Bahin Yojana चा फॉर्म…
- सर्वप्रथम माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) अधिकृत संकेतस्थळावर जा.
- संकेतस्थळाच्या होमपेजवर अर्जदार लॉग इन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- पेजवर लॉगिन इन पर्यायावर क्लिक केल्यावर, Doesn’t have account Create Account? हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- अकाउंट क्रिएटच्या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, त्यात तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे तुमचे नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड, जिल्हा, तालुका, गाव महानगरपालिका, अधिकारी व्यक्ती ही माहिती भरा.
- त्यानंतर नियम व अटी स्वीकारून कॅप्चा कोड भरा. त्यानंतर Signup पर्याय निवडा. आता तुमची नोंदणी होईल. मग तुम्हाला एक पासवर्ड दिला जाईल.
- पुन्हा एकदा लॉगिन इन पेजवर येऊन. तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून रीलॉग इन करा.
- आता डॅशबोर्डवर तुम्हाला Mazi Ladki Bahin Yojana Application Form वर क्लिक करायचे आहे. एक फॉर्म ओपन होईल. त्यात तुमचे नाव, पती/वडीलांचे नाव, वैवाहिक स्टेट्स, जिल्हा, बँकेचे नाव, खातेदाराचे नाव, खाते क्रमांक इत्यादीसारखी माहिती फॉर्ममध्ये भरा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, हमीपत्र आणि फोटो अपलोड करा, आणि मग Accept हमीपत्र पर्याय निवडा. शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करून म्हणजे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून कसा भराल फॉर्म?
- नारी शक्ती अँप वापरण्यासाठी सर्वात आधी प्लेस्टोरवरून ते डाउनलोड करावे. अॅप डाऊनलोड करून ते ओपन केल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर ‘नारीशक्ती दूत ह्या अँपमध्ये आपले स्वागत आहे.’ असा मेसेज दिसेल.
- अँपमध्ये लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा मोबाईल एंटर करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) आवश्यक असणारी प्रोफाइल तयार करा.
- प्रोफाइल अपडेट करण्यासाठी आलेल्या पॉपअप संदेशावर क्लिक करा,आणि तुमचं पूर्ण नाव, इमेल-आयडी ही माहिती भरा. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. त्यानंतर तुमचं प्रोफाइल अपडेट करा.
- प्रोफाइल अपडेट झाल्यावर योजना या पर्यायावर क्लिक करा, आणि त्यानंतर माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेचं हमीपत्र डाऊनलोड करा. त्यानंतर मुख्य पेजवर या, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पर्यायावर क्लिक करा.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पर्यायावर क्लिक करून फॉर्म भरण्यास सुरुवात करा. प्रथमतः तुमचे (महिलेचे) नाव, त्यानंतर अर्जदार महिलेच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव एंटर करावे . जन्मतारीख एंटर करावी.
- त्यानंतर पुढे जिल्हा, गाव किंवा शहर निवडा. त्यानंतर तुमचा पिनकोड, पत्ता आणि मोबाइल नंबर एंटर करा.
- त्यानंतर तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याबाबत विचारणा करण्यात येईल. तर यासाठी हो किंवा नाही या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
- यानंतर तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरा. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे पूर्ण नाव आहे ते भरा. तसंच तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडही भरा.
- यानंतर तुम्हाला काही कागदपत्रं अपलोड करावी लागतील. ज्यामध्ये तुम्हाला आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी पिवळे/केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करावी लागतील. त्यानंतर अर्जदाराचा फोटो जोडावा लागेल.
- आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर, तुम्हाला “एक्सेप्ट हमीपत्र आणि डिस्क्लेमर” असे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला दोन्ही पर्यायांवर टिक करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर, तुमच्यासमोर “माहिती जनक करा” असे बटन दिसेल. या बटनावर क्लिक करा. “जतन करा” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला दिसेल.
- आता, जर तुम्हाला या माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. अन्यथा, जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्ही “सबमिट करा” या पर्यायावर क्लिक करू शकता.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला सुरुवातीला नोंदवलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल. तुम्हाला हा OTP टाइप करणे आवश्यक आहे. OTP टाइप केल्यानंतर, तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल.
- आता, काही दिवसांमध्ये तुमचा फॉर्म तपासला जाईल. मंजूरी मिळाल्यास, तुमच्या खात्यात सरकारकडून ₹1500 ची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पीडीएफ अर्ज कसा भरायचा?
- पात्र महिलांना जर ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्या ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतात. त्यासाठी त्या अंगणवाडी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड या ठिकाणी जाऊन फॉर्म भरू शकतात.
- महिलेचा अर्ज अंगणवाडी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड येथील कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येईल आणि त्याची पोच पावती अर्ज दाखल केल्यावर महिलांना मिळेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. अर्जदार महिलेने अर्ज भरण्याच्या वेळी कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक आहे. जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्याचबरोबर महिलेने स्वतःचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.
Add Comment