Table of Contents
कोकणासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. कुठे पूरग्रस्तस्थिती निर्माण झालीय, तर कुठे रस्ते बंद झालेत. असाच काहीसा प्रकार आता कोकणच्या चिपळुण नजीकच्या खेडमध्ये घडली आहे. जोरदार पावसामुळे खेड रेल्वे स्थानकात दरड कोसळून जमा झालेल्या मातीमुळे रविवारी रेल्वेची (Konkan Railway) वाहतूक ठप्प झाली. गेल्या तेरा तासांपासून ही वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे बरेचसे प्रवासी रेल्वेत अडकून पडले आहेत. अनेक स्थांकांदरम्यान कोकण एक्स्प्रेस (Konkan Railway) जशाच्या तशाच उभ्या आहेत.
गेल्या १३ तासांपासून कोकणातून जाणारी कोचिवेल्ली एक्स्प्रेस ट्रेन चिपळूण स्थानकात अडकून पडली आहे. सुरुवातील ही ट्रेन ४ तास उशिराने धावेल असे सांगण्यात आले होते. मात्र आता १३ तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला तरी ट्रेन चिपळूण स्थानकावरून हलण्याचं नाव घेत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
रात्रभर ही ट्रेन चिपळूण स्थानकात अडकून आहे.
तसेच ट्रेन कधी सुरू होईल? कितीवेळ अजून प्रवाशांना वाट पाहावी लागेल? अशी कोणत्याही प्रकारची माहिती प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिली नव्हती. काल रात्रीपासून ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची अन्न आणि पाण्याची सोय करण्यात आली नाही. तसेच शौचालयातील पाणी संपल्यामुळे स्त्री आणि पुरूष प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे. आज सकाळासून प्रवाशांसाठी बसेसची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. पण, प्रवाशांची संख्या पाहता या बसेस पुऱ्या आहेत का?असा सवाल आता प्रवासी करत आहेत.
Konkan Railway ची वाहतूक कधी होणार सुरू?
खेड आणि विन्हेरे दिवणखाटी या स्थानकांदरम्यान ही दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे मती रुळावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक पुन्हा ८ वाजेपर्यंत पूर्ववत होईल असे कोकण रेल्वे (Kokan Railway) प्रशासनाने म्हटले आहे. श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी अशा विविध ठिकाणी कोकणाकडे जाणाऱ्या या गाड्या अडकल्या आहेत.
रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट
हवामान विभागाने आज रायगड आणि रत्नागिरी भागात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रविवारी पडलेल्या पावसामुळे या जिल्ह्यांतील अनेक नद्या दुथडी भरून वाहत होत्या. वसिष्ठी नदीचे पाणी पावसामुळे रविवारी संपूर्ण चिपळूण भागात शिरलं होत. सध्या जरी या दोन्ही भागात कमी पाऊस पडत असला तरी, आज मात्र येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे रत्नागिरी आणि रायगडधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Add Comment