News

Maharashtra Government ने बैठकीत घेतले 19 मोठे निर्णय

eknath shinde 2024 01 8b9621cb27af67e2122312b3e6f31668
Maharshtra Government ने घेतले नवे निर्णय...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य (Government) मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या हिताचे असे १९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय सरकारी कर्मचारी, शेतकरी, तसेच इतर सामान्य जनता यांच्या फायद्याचे निर्णय मानले जात आहेत.

निवडणुकीच्या आधी राज्य सरकार (Government) सामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेताना दिसत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले हे नवे निर्णय कुठेतरी वेगवेगळ्या स्तरावर लोकांना उपयोगाचे ठरणार आहेत.

Maharashtra Government घेतलेले महत्त्वाचे निर्णय कोणते?

Maharashtra Government घेतलेले महत्त्वाचे निर्णय कोणते?
Image Source: Mint
  • राज्यातील (Government) सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येणार आहे. मार्च २०२४ पासून याची अंमलबावणी करण्यात आली असून लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांसंबंधित सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.
  • ऑलिम्पिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाचे काम जलद गतीने करण्यात येणार आहे.
  • थकीत देण्यासाठी आता महावितरण कंपनीस कर्जासाठी सरकार (Government) हमी देणार आहे.
  • खडकवासला फुरसुंगी बोगदा काढण्याचा निर्णय. पुण्यात सिंचन आणि पुण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार.
  • नार – पार – गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी ७ हजार १५ कोटींची मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
  • सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी
  • येत्या ३० ऑगस्टपर्यंत शासकीय कर्मचऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल, ज्याचा फायदा सव्वा कोटी ज्येष्ठ नागरिकांना होईल.
  • ठाणे येथे क्लस्टर योजना लागू करण्यासाठी ५ हजार कोटी निधी उभारणार.
  • बार्टीच्या ७६३ विद्यार्थ्यांना मिळणार अधिछात्रवृत्तीचा लाभ
  • मुंबई महानगरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम जलद गतीने होणार. विविध महामंडळे राबविणार प्रकल्प.
  • कोल्हापुरात वारणा विद्यापीठ, समूह विद्यापीठ सुरू होणार.
  • कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडे आणि सेवाशुल्क माफ.
  • चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमीन आरक्षणात फेरबदल.
  • पाचोरे येथील सहकारी सूट उद्योगास मिळणार शासन (Government) अर्थसहाय
  • श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना
  • सायन येथील म्हाडाच्या जमिनीवर उभारले जाणार सहकार भवन