Table of Contents
महाराष्ट्रात नव्या-जुन्या शहरांचे बारसे मोठ्या जोमात सुरू आहे. आधी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्यात आले आहे. तर आता दुसरीकडे मुंबईतील ७ प्रसिध्द स्थानकांची नावे सुद्धा बदलली जाणार आहेत. ही नावे इंग्रजी असून ती ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती लवकरात लवकर बदलून त्यांना मराठी नावे देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. आता अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मुंबईतील (Mumbai) करीरोड, मरीन लाइन्स, कॉटन ग्रीन, चर्नी रोड अशी नावे बदलून आता मराठी करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संबंधीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला असून, या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात येणार आहे.
Mumbai शहरातील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
इंग्रजांच्या काळातही मुंबई व्यापारासाठीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. खुद्द मुंबई (Mumbai) शहराचे नाव सुरुवातीला बॉम्बे (Bombay) असे होते. पण कालांतराने ते मुंबई असे करण्यात आले. अगदी विटी स्थानकाचे नाव सुद्धत बदलून सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक पाऊल उचलत मुंबईतील ब्रिटिश टच असणाऱ्या काही स्थानकांची नावे सरकारने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. करी रोड, सँन्डहर्सड रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड रेल्वे स्थानक, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड रोड,किंग्ज सर्कल अशा ७ स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला आहे.
कशी असणार मुंबईतील या ब्रिटिशकालीन शहरांची नावे?
- करी रोड : लालबाग रेल्वे स्थानक
- सँन्डहर्सड रोड : डोंगरी रेल्वे स्थानक
- मरीन लाईन्स : मुंबादेवी रेल्वे स्थानक
- चर्नी रोड रेल्वे स्थानक : गिरगांव रेल्वे स्थानक
- कॉटन ग्रीन : काळा चौकी रेल्वे स्थानक
- डॉकयार्ड रोड : माझगाव रेल्वे स्थानक
- किंग्ज सर्कल : तिर्थंकर पार्श्वनाथ
शासनाच्या या निर्णयानंतर आता विरोधी पक्षांकडून देखील नामांतरणाच्या बाबतीत काही मागण्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद इंटरनॅशनल एअरपोर्टचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसचे नितीन राऊत यांनी सुद्धा दादर स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची मागणी केली आहे.
Add Comment