Table of Contents
मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी नेते (Maratha vs OBC) असा वाद गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू झाला आहे. मनोज जरांगे पाटीलांनी (Manoj Jarange Patil) केलेल्या प्रत्येक वक्तव्यावर ओबीसी नेते प्रत्युत्तर देताना दिसत आहेत आणि अशातच आज जरांगे पाटीलांची पत्रकार पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसी नेत्यांवर ताशेरे तर ओढलेच पण, मराठा नेत्यांना देखील खडेबोल सुनावले.
जरांगे पाटील म्हणाले, “मला आणि मराठा समाजाला घेरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे. आम्ही जी मागणी केली आहे ती अनेकांना पटली नाहीये.” पुढे ओबीसी आणि मराठा नेत्यांवर निशाणा साधत ते म्हणाले, “मराठा नेते फक्त मतांचा विचार करत आहेत आरक्षणाचा नाही.”
मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेले नेते आता उघडे पडले – Manoj Jarange Patil
“आम्ही सत्य बोलतो, कायद्याने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. तश्या सरकारी नोंदी देखील आहेत. ज्यात मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख आहे. मी नेमक्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्यामुळे सगळ्यांना पोटदुखी होऊ लागली आहे. हा मुलगा जोवर आहे तोवर मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल. मराठ्यांच्या मतांवर निवडून येणारे ओबीसी नेते आता उघडे पडले आहेत,” असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठा नेत्यांना आणि मराठा समाजाला आवाहन करत जरांगे म्हणाले, “महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना आणि मराठा समाजाला सांगतो, सगळ्या पक्षातील ओबीसी नेते आता मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून एकत्र आले आहेत. ते आरक्षणाचा विचार करत आहेत, मतांचा नाही. त्याउलट मराठा नेते मतांचा विचार करत आहेत, आरक्षणाचा नाही. हा फरक आहे त्यांच्यात (ओबीसी नेत्यांत) आणि मराठ नेत्यांत. आरक्षण हा विषय इतका महत्त्वाचा आहे की आता त्यांना मतं किंवा निवडून येणे महत्त्वाचे वाटत नाहीये.
“भाजपमधील सर्व ओबीसी नेते, आमदार, मंत्री एकत्र आले आहे. तसेच राष्ट्रवादी, पवारगट, शिंदेगट आणि इतर विरोधी पक्षातले ओबीसी नेते सुद्धा एकवटले आहेत. त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाहीये. पण हेच मराठा नेत्यांना काळात नाहीये. तुम्हाला कळत नाही की आरक्षण किती मत्त्वाचे आहे. मराठ्यांची जात यामुळे किती मोठी होईल”, असा हल्ला जरांगे पटीलांनी चढवला.
मी एकटा पडलोय, मला सगळ्यांनी घेरलंय – Manoj Jarange Patil
आणखी एक सांगतो, मराठा नेत्यांना आणि मराठ्यांना की मी एकटा पडलोय. मी आरक्षणासाठी लढतोय म्हणून सगळ्यांनी घेरलंय मला. याबाबतीत सत्ताधारी मराठा नेताही बोलत नाहीत, आणि विरोधी मराठा नेताही बोलत नाहीत. तुम्ही एकजूट राहा अशी माझी मराठा समाजाला विनंती आहे.
“मराठा नेत्यांनी एकजुटीने, ताकदीने उभं राहा. ६ जुलै ते १३ जुलै जी मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे, त्याला प्रत्येकाने उपस्थित राहा. ६ जुलैला एकही मराठा घरी राहणार नाही सगळे जणांनी आपल्या परिसरात जिथे कुठे जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅली असेल तिथे उपस्थित राहा,’ असं अवाहन जरांगे यांनी केलं आहे.
Add Comment