Table of Contents
पॅरिस (Paris) येथे सध्या ऑलिम्पिक (Olympic) स्पर्धा सुरू आहे, आणि क्रिडाजगतात या स्पर्धेला खूप महत्त्व आहे. याच स्पर्धेत १० मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत कांस्पदक जिंकत मनू भाकरने (Manu Bhaker) भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. तसेच मनू भाकर ही (Manu Bhaker) ऑलिम्पिक (Olympic) स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. २००४ मध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या सुमा शिरुरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. मनू भाकरने हे कांस्यपदक २२१.७ इतक्या गुणांसह मिळवलं आहे.
२२ वर्षीय मनू भाकर (Manu Bhaker) ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्याची. मनू भाकरने तिच्या नेमबाजीच्या करीअरमध्ये खूप छान कामगिरी केलीय. तसेच या खेळात तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील स्वतःचं नाव निर्माण केलंय. २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रतेमध्ये पिस्तुल बिघडल्यामुळे मनूला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. पण, यंदा कांस्यपदक जिंकत तिने (Manu Bhaker) सर्वांची मने जिंकली आहेत.
भारतीयांचे मी आभार मानते – Manu Bhaker
पदक जिंकल्यानंतर प्रसामाध्यमांशी संवाद साधताना मनू भाकर म्हणाली, ही फार वेगळी भावना आहे, जी मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पदक जिंकल्याचा मला प्रचंड आनंद आहे. हे पदक माझ्या एकटीचं नसून ही टीमची मेहनत आहे. मला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या भारतीयांचे मी आभार मानते. हे भारताचं पहिलं पदक आहे आणि भारत या ऑलिम्पिकमध्ये अजून पदकांची कमाई करेल याची मला खात्री आहे.
दरम्यान, स्पर्धेतील ५ शॉटच्या पहिल्या फेरीत ५०.४ अंक करून तिने दुसरे स्थान पटकावले. दुसऱ्या फेरीत तिने प्रत्येकी ५ शॉट्सच्या दोन मलिकांनंतर एकूण १००.३ अंक मिळवले. या अटीतटीच्या सामन्यात तीने पहिल्या तीन स्थानांवर आपली पकड मजबूत ठेवली. या सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे फक्त ०.१ अंकाने मनूचं रौप्यपदक हुकलं
Add Comment