Table of Contents
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) कधी आणि कुठे होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अशातच आता आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) देशाची राजधानी दिल्ली येथे होणार असल्याची बातमी समोर येत आहे.
दिल्लीत हा सोहळा होत असल्यामुळे मराठी (Marathi) भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार का? हा ही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. १९५४ नंतर तब्बल ७० वर्षांच्या कालावधीनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दिल्लीत भरवले जाणार आहे.
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दिल्लीत भरवले जावे, यासाठी सर्वांची खूप इच्छा होती. ‘सरहद’ या दिल्लीस्थित मराठी प्रतिष्ठानाने दिल्लीतील इतर मराठी संस्थांच्या मदतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) दिल्लीत आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला.
त्यामुळे याच पार्श्भूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्ली येथे होणार आहे. त्यातच या संमेलनादरम्यान मराठी (Marathi) भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आगामी साहित्य संमेलनासाठी एकूण सात ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी असे तीन पर्याय उमेदवारांसमोर ठेवले. स्थळ निवड समितीने आपला अहवाल सादर केला, आणि यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीत भरविण्याचा निर्णय घेतला.
हे संमेलन पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरवले जाईल. तर यासाठी तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील ठिकाणी याचे आयोजन केले जाईल. १९५४ साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टेखळी साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर आता ७० वर्षांनी पुन्हा साहित्य संमेलन दिल्लीत भरवले जाणार आहे.
दिल्लीत जर साहित्य संमेलन आयोजित केले गेले तर, ते मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे आपण दिल्लीमध्ये संमेलन घेण्यासाठी संधी द्यावी, अशी विनंती सरहद प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाला करण्यात आली होती.
Marathi भाषेला हवा असलेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा द्यावा की देऊ नये, हा निर्णय घेण्याची क्षमता फक्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे आहे. गृह मंत्रालयाने २००५ साली हा अधिकार देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाला दिला आहे. भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी ती पुढील निकषात बसणे आवश्यक आहे.
- भाषेला १५००-२००० इतका जुना नोंदवलेला इतिहास हवा.
- भाषेसंबंधी प्राचीन वारसा असलेले साहित्य उपलब्ध हवे.
- भाषेसमूहाकडे स्वतःचे असे कोणत्याही समूहाकडून उसने न घेतलेले साहित्य असावे.
- अभिजात भाषा ही दैनंदिन भाषेपेक्षा वेगळी असावी.
सध्याच्या घडीला केंद्रीय सांस्कृतीक मंडळाने तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे.
Add Comment