Table of Contents
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Vidhan Sabha session) आज सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असून, हे अधिवेशन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्यामुळे या पावसाळी अधिवेशनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
Monsoon session च्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गोंधळ
पण, आज अधिवेशनाचा पहिला दिवस असतानाच विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमा होत सरकारविरोधात जोरदार घोषणबाजीही केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तोडगा काढावा म्हणून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर गोंधळ घातला. टक्केवारी सरकार, चोर सरकार अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला.
घोषणांनी विधानभवनाचा परिसर एकीकडे दणाणून निघाला असताना, दुसरीकडे आज विधानभवनात पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, त्यांची नावे वाचून दाखवली.
Monsoon Session दरम्यान समोर आलेली राजीनामा दिलेल्या सदस्यांची यादी
- राजू पारवे – उमरेड विधानसभा (राजीनामा – २४ मार्च)
- निलेश लंके – पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल)
- प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा
- बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
- प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून)
- संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून)
- रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
- वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा
राजू पारवे यांचे नाव वगळल्यास इतर आमदार जे लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत आणि संसदेत गेले आहेत, त्या आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे, निलेश लंके यांच्यासह ८ आमदारांचा समावेश आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला आणि आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढवली. पण,रामटेकच्या मतदारसंघात त्यांना काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांच्यकडून हार पत्करावी लागली.
Add Comment