Table of Contents
मराठी मालिकाविश्वात अनेक घडामोडी घडत असतात. त्यातलीच एक महत्वाची घटना म्हणजे मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिचा मराठी सिनेसृष्टीतला कमबॅक. मृणालने (Mrunal Dusanis) आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. 2010 मध्ये झी मराठीच्या “माझिया प्रियाला प्रित कळेना” या मालिकेतून तिने मराठी मालिकाविश्वात पदार्पण केले. या मालिकेत तिने मुख्य पात्र साकारले ज्याचे नाव शमिका राजे असे होते. त्यानंतर “तु तिथे मी”, “अस्स सासरं सुरेख बाई”, “सुखाच्या सरींनी हे मन बावरे” अशा एकापेक्षा एक प्रसिद्ध मालिकांमध्ये तिने काम केले आहे.
यापूर्वी तिने एका पेक्षा एक अप्सरा आली या डान्स रिऍलिटी शोमध्ये सुद्धा भाग घेतला होता. तिने आतपर्यंत साकारलेल्या सोज्वळ आणि साध्य भूमिकांमुळे तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र करिअरच्या शिखरावर असताना मृणालने सिनेसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आणि, त्यानंतर लग्न करून ती अमेरिकेला निघून गेली. त्यामुळे ती मालिकांमध्ये काम करायला पुन्हा कधी सुरुवात करणार? याची चाहते वाट पाहत असताना, मृणाल पुन्हा मालिकाविश्वात पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Mrunal Dusanis करणार पुन्हा कमबॅक
अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहणारी मृणाल आता पुन्हा मायदेशी परतली आहे. भारतात परत येताच तिने अनेक माध्यमांना मुलाखती देखील दिल्या. या मुलाखतींमध्ये बोलत असताना “मला लवकरच काम करायला आवडेल.”असं ती म्हणाली होती. मराठी सिरियल ऑफिशियल या इन्स्टाग्रामच्या अधिकृत हॅन्डलने मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) सोबतचा सेटवरचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे मृणाल पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करणार या चर्चांना उधाण आले आहे.
मराठी सिरियल ऑफिशियल या इंस्टाग्रामच्या अधिकृत हॅण्डलवरून मृणालचा (Mrunal Dusanis) हा फोटो व्हायरल झाला आहे. त्या व्हायरल झालेल्या फोटोखाली “अँड वी आर बॅक ऑन द सेट” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे आता तब्ब्ल 4 वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा मृणाल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच ती आता कायमस्वरूपी भारतातच राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पण, आता मृणाल नेमक्या कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? आणि आता ती मालिका, नाटक कि चित्रपट यापैकी नेमक्या कोणत्या माध्यमातून पुनर्पदार्पण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Add Comment