Table of Contents
मुंबई शहराला चहूबाजूंनी अरबी समुद्राचे घेरले आहे. त्यामुळे पावसाळ्यात वर्षभराच्या तुलनेत मोठ्या वेगाने समुद्रात लाटा उसळायला सुरुवात होते. जुलै महिन्यात हळूहळू पावसाने जोर धरायला सुरुवात केली, आणि काल परवा पडलेल्या पावसाने मुंबईकरांचे (Mumbai) हाल केले. मुसळधार पावसामुळे मुंबईसह (Mumbai) उपनगरात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल वाहतुक विस्कळीत झाली आहे. तसेच दादर, परळ या भागात खूप प्रमाणात पाणी साचलं आहे. (Weather Update)
मुंबईच्या वाडिया आणि के.ई.एम.रुग्णालयात जवळपास एक ते दीड फूट पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेकांना या पाण्यातून मार्ग काढत जाणं कठीण झालं आहे. तसेच या दरम्यान मुंबई पोलिसांनी पण नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या संबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे.
Mumbai पोलिसांनी ट्विटरवरून केलं आवाहन
मुंबईत (Mumbai) सध्या जोरदार पाऊस पडत आहे. सर्वत्र या पावसामुळे पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. याचदरम्यान हवामान, पर्जन्यस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून एक महत्त्वाचं आवाहन नागरिकांना केलं आहे. मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की, नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, महत्त्वाचे काम असेल तर घराबाहेर पडावे. कृपया नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि गरज पडल्यास घराबाहेर पडावे आणि संकटसमयी 100 नंबर डायल करावा. (Weather Update)
अवघ्या तीन दिवसात 326 मिलिमीटर पावसाची नोंद मुंबई शहरात करण्यात आली आहे. घाटकोपरच्या भाटोडी कातोडी पाडा येथे मुसळदार पावसामुळे दरड कोसळली आहे. पण, सुदैवाने कुणालाही कुठलीही दुखापत झालेली नाही.
पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडणार
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी तीन दिवसांपूर्वीच पात्राबाहेर आले होते. तर, सोमवारी पंचगंगा नदीने धोक्याची इशारा पातळी गाठली असून, तिची वाटचाल आता धोका पातळीकडे सुरू आहे. सध्या नदी ३९ फूट पातळीवर असून तिची धोका पातळी ४३ फूट आहे.
दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही पुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे या गावात लोकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाकडून या गावातील नागरिकांसाठी आणि जनावरांसाठी निवारा केंद्रही उभारण्यात आली आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर, शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी जाधववाडी येथे २ फूट पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. तर वाहतूक पर्यायी मार्ग असलेल्या अनुस्कुरा घाटमार्ग वरनमळी येथे बंद झाला आहे. यामुळे कोल्हापुराहून रत्नागिरीला जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत.
चंद्रपुरात मुसळधार पाऊस
मुंबईप्रमाणे चंद्रपुरात पण पावसाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार कोसळणाऱ्या या पावसाने चंद्रपुरकरांना हैराण केलं आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात कोल्हापूर सारखीच पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Add Comment