News

सिंधुदुर्ग प्रकरणी Narendra Modi यांनी मागितली जाहीर माफी

vadh 1
Narendra Modi यांनी मागितली माफी

सध्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे राज्यातील राजकारण फारच तापलं आहे. त्यातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पालघर दौऱ्यावर होते. स्थानिकांचा तीव्र विरोध असलेल्या विवादित वाढवण बंदराचे उद्घाटन करण्यासाठी ते पालघर येथे आले होते. पण यावेळी सिंधुदुर्गात घडलेल्या घटनेची त्यांनी माफी मागितली.

यावेळी भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात केली. माझ्या सर्व लाडक्या बहिणी, भावांना या सेवकाचा नमस्कार, अशी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा उल्लेख करत त्यासंबंधी माफी पण मागितली.

काय म्हणाले Narendra Modi?

“मला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. 2013 मध्ये जेव्हा भाजपाने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निश्चित केलं तेव्हा मी सर्वात आधी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताला जशी प्रार्थना करतो त्याच भक्तीभावाने आशीर्वाद घेत राष्ट्रसेवेच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती,” असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे झालं ते दुर्दैवी आहे. माझ्यासाठी, माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त नाव किंवा राजा महाराजा नाहीत तर आराध्य दैवत आहेत. मी आज मान झुकवून आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत”.

“आमचे संस्कार वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांसारखे नाही. ते सतत सावरकरांचा अपमान करतात. देशभावना पायदळी तुडवतात. वीर सावकरांना शिव्या दिल्यानंतरही माफी मागण्यास जे तयार नाहीत, न्यायालयात जाऊन लढाई लढण्यास तयार आहेत, ज्यांना पश्चाताप होत नाही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार समजून घ्यावेत. मी येथे आल्यावर महाराजंच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागण्याचं काम करत आहे. इतकंच नाही जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात त्यांच्या मनाला ज्या वेदना झाल्या आहेत त्यांचीही मान झुकवून माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आराध्य दैवतापेक्षा कोणी मोठं नाही,” असंही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

About the author

Pradnya Mestri

Add Comment

Click here to post a comment